कोल्हापूर

इचल : मुख्य अंकासाठी

CD

38074
सांगली ः येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची इचलकरंजीतील हाळवणकर समर्थक नगरसेवकांनी भेट घेतली.

हाळवणकर यांना दिलेला
शब्द पाळणार ः मंत्री बावनकुळे
इचलकरंजी, ता. १८ ः ‘पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असताना माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे शब्द पाळणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल,’ अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मंत्री बावनकुळे काल सांगली दौऱ्यावर होते. त्यावेळी इचलकरंजीतील हाळवणकर समर्थक असलेल्या भाजपच्या नगरसेवक, नगरसेविकांच्या शिष्टमंडळाने त्यांची सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. ‘हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी द्यावी,’ अशी मागणी शिष्टमंडळाने केली. अशोक स्वामी, तानाजी पोवार आदींनी भूमिका मांडताना हाळवणकर यांनी केलेला त्याग आणि पक्षासाठी दिलेले योगदान याची मांडणी केली. ‘१९९२ पासून हाळवणकर यांच्याशी मैत्री आहे. त्यांच्याबाबत सकारात्मक आहोत,’ असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, उपमहापौर अनिल डाळ्या, अशोक स्वामी, तानाजी पोवार, अजित जाधव, मनोज हिंगमिरे, मारुती पाथरवट, शहाजी भोसले, दिलीप मुथा, मनोज साळुंखे, जहाँगीर पटेकरी, रुपा बुगड, विद्या साळुंखे, सुरेखा जाधव, अरुणा बचाटे, मनीषा नवनाळे, विजया महाजन आदींचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

Hormuz Strait : होर्मुझ तणाव पेटला! भारतीय जहाजावर गोळीबारानंतर मोदी सरकारचा राग उफाळला; इराणी राजदूतांना समन्स

Senior Living Athashri: परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती; वडोदऱ्यात सहा हजाराव्या ज्येष्ठ रहिवाशाला घराचा ताबा

Satara Politics: पाटणच्या पाणीप्रश्नावरून शंभुराज देसाईंचा पाटणकरांना अप्रत्यक्ष टोला; ठेकेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT