जात पडताळणी माहिती मार्गदर्शन
कोल्हापूर : गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जिल्हा जातपडताळणी समितीतर्फे १२ वी विज्ञान वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक माहिती दिली. आशा रावण यांनी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राचे महत्त्व, जात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे, शासकीय वेबसाईट, कालावधी आणि कागदोपत्री पुरावेसंदर्भातील माहिती दिली. यावेळी जिल्हा जातपडताळणी समितीचे उपायुक्त भारत केंद्रे, संशोधन अधिकारी संभाजी पोवार यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. जयकुमार देसाई, प्रा. डॉ. मंजिरी मोरे, दौलत देसाई, पृथ्वी मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्य एन. टी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. एल. धनवडे, राजेंद्र गायकवाड, सोमनाथ कवठे, प्रा. रवींद्र सुतार, प्रा. प्रशांत बेरगळ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.