कोल्हापूर

पाणी बंद

CD

निम्म्या शहरातील
पाणीपुरवठा आज बंद
कोल्हापूर, ता. १७ : महावितरणकडून बालिंगा उपकेंद्राकडील उच्चदाब वाहिनीचे काम केले जाणार असल्याने सोमवारी (ता.२०) वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी बालिंगा उपसा केंद्राकडील पाणी उपसा बंद राहणार असल्याने संपूर्ण सी, डी वॉर्ड तसेच ए, बी, ई वॉर्डमधील काही भागातील पाणी सोमवारी बंद राहणार आहे. मंगळवारीही (ता. २१) पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.
संपूर्ण सी, डी वॉर्डमधील दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवार पेठ तालीम परिसर, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज, अंबाबाई मंदिर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी परिसर, देवल क्लब, ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरीतील पाचवी ते आठवी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक, ए, बी, वॉर्ड त्यास संलग्न उपनगरे, ग्रामीण भाग व लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजे संभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठेत पाणीपुरवठा राहणार नाही.
नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीजेचा लपंडाव, सोलापूर शहराला आता ४ दिवसाआड पाणी! औज बंधारा कोरडा, पाकणीचे जलशुद्धीकरण केंद्र बंद, सोरेगावचा पंप जळाला, वाचा...

Panchang 20 April 2026 : अक्षय्य तृतीया विशेष पंचांग! शुभ मुहूर्त, ग्रहयोग आणि आजचे महत्त्व जाणून घ्या

मोठी बातमी! खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती आता ऑनलाईन; अल्पसंख्यांक शाळांमधील पदभरतीसाठी स्वतंत्र पोर्टल, संस्थापकांची थांबणार मनमानी

आजचे राशिभविष्य - २० एप्रिल २०२६

Latur Crime: चुलतीने केला सात वर्षाच्या बालकाचा खून; चाकूर तालुक्यातील थरारक घटना, दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT