कोल्हापूर

गड-बसवेश्वर जयंती

CD

gad198.jpg

38386

छत्रपती शिवरायांसह बसवेश्वरांना अभिवादन
जयंती उत्साहात; मिरवणुकीसह विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. १९ ः शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसह महात्मा बसवेश्वर महाराजांना अभिवादन करण्यात आले. विविध उपक्रम आणि सायंकाळी मिरवणुका झाल्या. सकाळी मठ आणि मंदिरांपासून तरुणांनी आणलेल्या बसवज्योतीचे उत्साही स्वागत झाले.
वीरशैव चौकातील महात्मा बसवेश्वर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी होती. जयंतीनिमित्त बसवेश्वर पुतळा फुलांनी सजविलेला होता. रोषणाई केली होती. वीरशैव समाज सेवा मंडळ आणि बसवेश्वर जयंती उत्सव समितीतर्फे सकाळी पुष्पहार घालून अभिवादन केले. महादेव मंदिरात विद्यार्थ्यांसाठी वचन स्पर्धा झाल्या. स्पर्धेद्वारे बसवेश्वरांच्या विचारांचा जागर झाला. सायंकाळी महादेव मंदिरापासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ झाला. राजशेखर दड्डी, सुरेश कोळकी, सचिन घुगरे, प्रवीण मेणशी, सचिन पाटील, यश इंगळे, विलास रामणकट्टी, अभिजित पाटील, मिलिंद रिंगणे, सचिन आजरी, नंदू पाटील, रवी निडसोशी आदींसह समाजबांधवांनी नियोजन केले. दरम्यान, खेडोपाडीही तरुणांनी ठिकठिकाणाहून बसव ज्योत, शिवज्योत आणली. त्याचे उत्साही स्वागत झाले.

* डॉ. घाळी महाविद्यालय
डॉ. घाळी महाविद्यालयात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व विचारमंथन कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दत्ता पाटील होते. बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. समाजसुधारणेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. प्राचार्य डॉ. पाटील यांनी बसवेश्वर यांच्या समता, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. शशिकांत संघराज व ओमकार खतकले यांनी महात्मा बसवेश्वरांच्या कार्याला उजाळा दिला. संकेत बेल्लद यांनी बसवेश्वरांच्या कार्याचा आढावा घेतला. अमूल्या हुल्लोळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
राजश्री म्हंकावे यांनी सूत्रसंचालन केले. सौरभ पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT