शिवजयंतीनिमित्त सरबत वाटप
इचलकरंजी ः शिवजयंतीनिमित्त सलग दहाव्या वर्षी रवी रजपूते फाउंडेशनतर्फे शिवतीर्थ येथे सरबत वाटप करण्यात आले. आमदार राहुल आवाडे यांच्याहस्ते हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी सभापती सतीश मुळीक, अशोक स्वामी, पुंडलिक जाधव, नगरसेवक राजू बोंद्रे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड आदी उपस्थित होते. रोहित रजपूते यांनी आभार मानले.
-
इचलकरंजीत शुक्रवारपासून
राशिनकर व्याख्यानमाला
इचलकरंजी ः येथील चाणक्य प्रतिष्ठान आणि श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे २४ ते २७ एप्रिल या कालावधीत रामभाऊ राशिनकर स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली आहे. शुक्रवारी डॉ. भूषण केळकर (पुणे) हे ‘एआय संधी आणि आव्हाने’ या विषयावर, शनिवारी (२५) विजयराव जोशी (कऱ्हाड) हे ‘रा. स्व. संघाची १०० वर्षांची वाटचाल’ या विषयावर भाष्य करतील. रविवारी (२६) डॉ. विनायक गोविलकर (नाशिक) हे ‘डॉलरची दादागिरी का आणि किती काळ?’ यावर ऊहापोह करणार आहेत. सोमवारी (२७) यजुर्वेंद्र महाजन (जळगाव) हे ‘चांगला माणूस घडताना’ या विषयावर मार्गदर्शन करतील. दररोज सायंकाळी ६.३० वाजता येथील लायन्स क्लब हॉल (दाते मळा) येथे ही व्याख्यानमाला होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.