38940
इचलकरंजी ः सांगली रोडवरील पाटील मळ्यात पाण्यात आळ्या आढळल्या. (छायाचित्र ः छोटूसिंग)
इचलकरंजीत पाटील मळ्यात
नळाच्या पाण्यात आळ्या
इचलकरंजी, ता. २२ ः एकीकडे शहरात पाणी पुरवठा विस्कळीत होत असून दुसरीकडे सांगली रोडवरील पाटील मळा परिसरात नळाला आलेल्या पाण्यात आळ्या आढळून आल्या. या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार केली आहे. जलवाहिनीच्या गळतीमुळे हा प्रकार होत असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार गळती शोधण्याच्या सूचना जल अभियंता अभय शिरोलीकर यांनी यंत्रणेला दिल्या आहे.
सांगली रोड परिसरातील सांगली मळा, साईट नंबर १०२ मधील वसाहतीत चार दिवसांनी पाणी पुरवठा केला. काही नळांना पाण्यातून आळ्या आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती नगरसेवक मारुती पाथरवट यांना दिली. त्यांनी केलेल्या पाहणीत पाण्यातून आळ्या आल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने ही माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला दिली. सध्या शहरात खोदाई करण्यात येत आहे. हे काम करीत असताना जलवाहिनी फुटण्याचे प्रकार होत आहेत. ती जोडताना पुरेशी दक्षता घेत नसल्यामुळे त्या जलवाहिनीतून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे प्रकार घडत आहेत. या शिवाय कुडचे मळा परिसरात नळाला काळेकुट्ट पाणी येत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.