आजरा हायस्कूलच्यावतीने
कुंभार, भोसले यांना श्रध्दांजली
आजरा ः येथील जनता एज्यूकेशन सोसायटीच्यावतीने प्रा. ज्योती नितीन कुंभार व वैष्णवी तुकाराम भोसले यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. आजऱ्यात झालेल्या दुर्घटनेत त्यांचे निधन झाले. आजरा महाविद्यालय, आजराच्या ज्युनिअर काॅलेजमधे प्रा. कुंभार प्राध्यापिका होत्या. वैष्णवी आजरा हायस्कूलमधे सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. त्यांच्या निधनाने कुंभार व भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.