कोल्हापूर

आजरा ः ब्राहमण सभा कार्यकम

CD

ajr223.jpg...


38974

धर्म संस्कारांतून देव ओळखा
डाॅ. आनंद महाराज ः आजऱ्यात ब्राह्मण सभेचा कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

आजरा, ता. २२ ः ‘‘धर्म संस्कारांतून देव ओळखा. त्यासाठीची पात्रता अंगी येण्यासाठी प्रयत्न करूया,’’ असे प्रतिपादन हत्तरगी मठाचे मठाधीश डॉ. आनंद महाराज गोसावी यांनी केले.
येथील चैतन्य सभागृहात ब्राह्मण सभेतर्फे भ्रूगुकुलोत्पन्न भगवान परशुराम यांची जयंती झाली. या वेळी डाॅ. आनंद महाराज यांनी मार्गदर्शन केले. भगवान परशुराम प्रतिमापूजन व षोडशोपचार पूजा झाली. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संत महात्मा बसवेश्वर यांनाही अभिवादन करण्यात आले. महिला व पुरुष बांधवांनी हनुमान चाळीसा व श्री विष्णुसहस्र नाम पठण केले. ब्राह्मण सभा, आजराचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, श्रद्धा कुलकर्णी आणि उपाध्यक्षा डाॅ. अंजनी देशपांडे यांच्या हस्ते डाॅ. आनंद महाराज यांचा सत्कार झाला. डाॅ. आनंद महाराज यांनी धर्म, धर्मआचरण, संस्कार आणि आदर्श जीवन पद्धतीसाठी अंगीकाराव्या लागणाऱ्या मूल्यांविषयी मार्गदर्शन केले. सुनील देसाई यांचाही सत्कार झाला. ब्राह्मण सभेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा झाली. महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम झाला. डॉ. दीपक सातोस्कर, डॉ अनिल देशपांडे, शुभदा जोशी, जयवंत केळकर ब्राह्मण सभेचे खजिनदार संदीप वाटवे, सचिव विनय फाळणीकर, चेतन केळकर, गौरव देशपांडे, नरेंद्र जोशी, अवधूत सबनीस, सोमनाथ भातखंडे, दीपक जोशी यासह समाजबांधव उपस्थित होते. शंकर आपटे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT