कोल्हापूर

गड- कर्मचारी संप

CD

gad222.jpg

38988

खरेदी-विक्री व्यवहारांवर परिणाम
कर्मचाऱ्यांचा संप ः नागरिकांची गैरसोय, दाखलेही मिळेनात

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. २२ ः विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनात महसूलसह मुद्रांक सहाय्यक निबंधक कार्यालयातील कर्मचारीही सहभागी झाले आहेत. परिणामी निबंधक कार्यालयात जमीन, फ्लॅट, घरांच्या खरेदी-विक्री व्यवहार तटलेले आहेत. आंदोलन न मिटल्याने ते हैराण झाले आहेत. खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्पच झाल्याने शासनाच्या महसूलावरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे. साधारण रोज २० ते २५ विविध व्यवहाराचे दस्त येथे होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच तहसील कार्यालयाचे कामकाजही ठप्प झाले आहे.
महसूल विभागातील कर्मचारी, अधिकारी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. यापूर्वीच संघटनेच्यावतीने मागण्यांची पूर्तता करा; अन्यथा काम बंदचा इशारा दिला होता. नोव्हेंबर २०२५ नंतर नियुक्त कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंमलबजावणीची अधिसूचना काढावी यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी शासनाला पत्र दिले होते. परंतु, सोमवारी रात्रीपर्यंत तोडगा न निघाल्याने काम बंदचे आंदोलन सुरू केल्याचे संघटनेने सांगितले. दरम्यान, आंदोलनात गडहिंग्लज महसूलसह विविध कार्यालयातील सरकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामुळे कामकाज ठप्प झाले आहे. महसूल विभागाकडे नागरिकांची कामासाठी वर्दळ असते. परंतु आंदोलनामुळे त्यांची कामे अडकली आहेत. विविध शैक्षणिक दाखले, जात प्रमाणपत्र, जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळण्यात अडचणी येत आहेत. तहसीलदारांकडील सुनावण्याही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे नेहमी वर्दळ असणारा कचेरी रोड दोन दिवसापासून शांत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

एकेकाळी प्रफुल पटेलांचे PA ते आता राज्यसभेसाठी पक्षाकडून उमेदवारी, कोण आहेत राजेंद्र जैन?

Petrol-Diesel-CNG Price: LPG गॅस दरवाढीनंतर आज पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर! आता किती रुपये मोजावे लागणार?

Rahul Gandhi: मोदींना वाटते, युवकांनी भजी तळावीत: राहुल गांधी, सीबीएसई घोटाळा प्रकरण तापले

SCROLL FOR NEXT