39111
मांगनूर ः येथे संग्रामसिंह कुपेकर यांचा सत्कार झाला. यावेळी उपस्थित शारूबाई चव्हाण, स्नेहल जाधव, प्रकाश पाटील, दत्ता देसाई आदी होते. .
मांगनूरमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
गडहिंग्लज ः मांगनूर तर्फ सावतवाडी (ता. गडहिंग्लज) ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर, सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण, उपसभापती अमर हिडदुगी, पंचायत समिती सदस्य स्नेहल जाधव यांचा सत्कार झाला. यावेळी कुपेकर यांनी मांगनूर गावच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. सरपंच शारूबाई चव्हाण, उपसरपंच प्रकाश पाटील, मुंबई मंडळचे अध्यक्ष दत्ता देसाई, बाजार समितीच्या संचालक सुगंधा पाटील, आत्माराम देसाई, दिनकर शिंगटे, सचिन घुगरे, सुभाष साळवे, चंद्रकांत करडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
.......................................
‘शिवराज’मध्ये कला शाखेतर्फे कार्यक्रम
गडहिंग्लज ः येथील शिवराज महाविद्यालयात बी.ए.भाग तीनच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एस. एम. कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे उपस्थित होते. कुराडे म्हणाले, ‘कला शाखा माणूस घडविण्याचे कार्य करते. या शाखेचा विद्यार्थी सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असतो.’ संस्थेच्या संचालिका व नगरसेविका प्रा. बिनादेवी कुराडे यांनीही मार्गदर्शन केले. दीक्षा देसाई, सलोनी किल्लेदार, श्रेया पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. ए. के. मोरमारे यांनी स्वागत केले. वेदांती पालकर यांनी सूत्रसंचालन केले. संयोजन डॉ. रंगराव हेंडगे, प्रा. पौर्णिमा कुराडे, डॉ. एस. बी. माने यांनी नियोजन केले.
-------------------------------------------
मांगनूरमध्ये पांगारे यांचे प्रवचन
गडहिंग्लज ः तालुक्यातील मांगनूर तर्फ सावतवाडी येथे जीवन विद्या मिशनतर्फे भरत पांगारे यांचे प्रवचन झाले. त्यावेळी ग्रामपंचायत व संत गजानन ग्रुपतर्फे नवनिर्वाचित सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण यांचा सत्कार झाला. भविष्यात खेड्यात राहणाऱ्या महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यासह त्यांना मोफत सुविधा देण्याची ग्वाही डॉ. चव्हाण यांनी दिली. शरद देसाई यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच प्रकाश पाटील यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
-----------------------------------------
39110
गडहिंग्लज ः शिवराज महाविद्यालयात कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. किसनराव कुराडे यांच्याहस्ते झाले. यावेळी डॉ. एस. एम. कदम, डॉ. अशोक मोरमारे आदी उपस्थित होते.
‘शिवराज’मध्ये कर्मवीर शिंदे जयंती
गडहिंग्लज ः येथील शिवराज महाविद्यालयात समाजसुधारक कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांची जयंती झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. डॉ. अशोक मोरमारे यांनी स्वागत केले. कर्मवीर शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे व संचालिका प्रा. बिनादेवी कुराडे यांच्याहस्ते झाले. सचिव डॉ. अनिलराव कुराडे प्रमुख उपस्थित होते. प्रा. बिनादेवी कुराडे, पदव्युत्तर विभागप्रमुख डॉ. महेश चौगुले यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ. एस. डी. सावंत यांनी आभार मानले.
----------------------------------------------
मुखर्जी ग्रंथालयात पुस्तक दिन
गडहिंग्लज ः येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी ग्रंथालय व अभ्यासिकेमध्ये जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष संदीप नाथबुवा यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन झाले. संस्थेच्या सचिव स्नेहा नाथबुवा, संचालक अशोक पाटील, विजय पाटील, ग्रंथपाल अंकिता पाटील यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
--------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.