कोल्हापूर

गड- बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुभाष डोंगरे

CD

39196
सुभाष डोंगरे, सुनील नंदगावे, संपदा पवार
--------------------------------------
गडहिंग्लज बार असोसिएशनच्या
अध्यक्षपदी ॲड. सुभाष डोंगरे

गडहिंग्लज, ता. २३ ः गडहिंग्लज तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. अध्यक्षपदी ॲड. सुभाष डोंगरे (जरळी) यांची, तर उपाध्यक्षपदी ॲड. सुनील नंदगावे यांची निवड झाली. सचिव म्हणून संपदा पवार-केसरकर, लोकल ऑडिटरपदी सुरेखा बेल्लद-पाटील, ग्रंथपालपदी शिवराज पाटील, सदस्य म्हणून संजय मोहिते, तर महिला सदस्या म्हणून स्नेहल पाटील-साळुंखे यांना संधी देण्यात आली. या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. विवेकानंद घाटगे, जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांत चिटणीस, प्रशांत देसाई, आनंदराव जाधव, आनंदराव सावंत यांची भाषणे झाली. शीतल दळवी यांनी आभार मानले. बी. बी. घाटगे, आर. आर. चव्हाण, एम. व्ही. पाटील, ए. जी. देशपांडे, डी. बी. नागोंडा, एस. बी. देसाई, आर. एस. तोडकर, आर. आर. पालकर, शीतल पाटील आदी उपस्थित होते.
--------------------------------------
‘ओंकार’मध्ये इंग्रजी भाषा दिन
गडहिंग्लज ः येथील ओंकार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे शेक्सपियर जयंती व पुण्यतिथीदिनी जागतिक इंग्रजी भाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शेक्सपियरच्या नाटकांचे सादरीकरण केले. प्रा. स्नेहल ताडे यांनी नाटकाची प्रस्तावना केली. प्राचार्य डॉ. अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रा. स्वयंप्रभा सरमगदूम यांनी शेक्सपियरच्या जगप्रसिद्ध साहित्यकृतींना उजाळा दिला. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांचे प्रोत्साहन मिळाले. प्रा. गजानन कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi: नीरव मोदीसह इतरांवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द, CBI न्यायालयाचा मोठा निर्णय

मी सेटवरून रडत घरी आलेले... निवेदिता सराफ यांनी सांगितला हिंदी मालिकेचा कटू अनुभव; म्हणाल्या, 'माझ्या आईने मला...'

Monsoon 2026: राज्यासाठी धोक्याची घंटा, यंदा पाऊस कमी होणार.. चिंता वाढली..

Latest Marathi News Live Update : ठाणेकरांवर पाणीसंकट गडद, धरणाच्या पाणीपातळीत घट

Pachod Water Issue : पाणीपुरवठा योजनांचा केवळ फार्स ..! तीन योजना राबवूनही थेरगाव येथे तहान भागविण्यासाठी जिवघेणी कसरत

SCROLL FOR NEXT