कोल्हापूर

आमदार संजय गायकवाडांकडून अर्वाच्च शिवीगाळ

CD

बुलढाण्याचे आमदार गायकवाडांकडून शिवीगाळ
गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या प्रकाशकाची तक्रार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अर्वाच्च शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांनी आज राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली.
आंबी यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे की, ‘शिवाजी महाराजांना एकेरी भाषा वापरणारे गोविंद पानसरे कोण? पानसरेंचे काय झाले तुला माहीत आहे ना! मी आमदार आहे, तुला घरात घुसून मारेन, तुला पानसरेंना भेटायला पाठवू,’ अशा शब्दांत त्यांनी धमकी दिली तसेच शिवीगाळही केली.
तक्रार अर्जात ते लिहितात, ‘२२ एप्रिलला मध्यरात्री १२ वाजून ५१ मिनिटांनी फोन आला. त्यावेळी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव आमदार गायकवाड असे सांगितले. तू काही जास्त शहाणपणा शिकवू नकोस. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड आहे. तुला उद्या सकाळी कोल्हापुरात उत्तर भेटेल, जा कोठे रिपोर्ट द्यायचा तिकडे दे, कोठे पब्लिश करायचे ते पब्लिश कर...’अशी धमकी दिली तसेच शिवीगाळ केली. ‘संभाषणादरम्यान मी त्यांना अनेकवेळा तुम्ही पुस्तक वाचा, अशी विनंती केली; पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी,’ असेही तक्रार अर्जात नमूद केले आहे.

चौकट ः
पानसरेंच्या हत्येशी संबंध आहे का?
आमदार संजय गायकवाड यांचा पानसरेंच्या हत्येशी काही संबंध आहे का, याचा तपास करण्याची मागणी स्मिता पानसरे यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, ‘लोकप्रतिनिधी असतानासुद्धा महिलांना शिवीगाळ करणे त्यांना न शोभणारे आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे या घटनेविरोधात राज्यभर आंदोलन करू.’ याबाबत मेघा पानसरे म्हणाल्या, ‘या पुस्तकाच्या लाखो प्रती तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यातील त्यांचा विचार मारता येत नसल्यानेच हा प्रकार घडला असून, त्यांचा तीव्र निषेध आहे.’
..........
चौकट ः
कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही
राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश होडगर याबाबत म्हणाले, ‘आंबी यांनी दिलेला तक्रार अर्ज स्वीकारण्यात आला असून, ऑडिओ क्लिपचीही तपासणी केली जाणार आहे. रेकॉर्डिंगमधील आवाज कोणाचा? धमकीमागील हेतू काय या व इतर गोष्टी पाहिल्या जातील. तसेच सर्व कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही करणार आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election 2026: विधान परिषद निवडणुकीत मोठा धक्का! पराभूत दिग्गजांना 'नो एंट्री'; भाजपची ‘नो रिपीट’ पॉलिसी लागू

काजोलने का तोडला स्वतःच बनवलेला नियम? 'या' सीरिजमध्ये दिला किसिंग सीन, अखेर अभिनेत्रीने सांगितलं कारण

Latest Marathi News Live : आळंदी येथे आढळला पहिल्यांदा 9 फुटी अजगर

Western Ghats Biodiversity: पश्चिम घाटात ओडोनाटाच्या १४३ प्रजातींची नोंद; जैवविविधतेत ३५% घट चिंताजनक, दोन वर्षांच्या सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष!

Kolhapur Circuit Bench : 23 एकर जागा मिळाली, आता 50 एकरची गरज! खंडपीठासाठी शेंडा पार्कात आणखी जागा आवश्‍यक, मुख्य न्यायमूर्तींकडून पाहणी

SCROLL FOR NEXT