40025
कोल्हापूर ः जिल्हास्तरीय फेन्सिंग स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित विनय जाधव व इतर मान्यवर.
......................
श्रेया, कार्तिकी, स्वराज, पीयूष विजयी
जिल्हास्तरीय कॅडेट फेन्सिंग स्पर्धा ः संघ निवड चाचणीही उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः जिल्हास्तरीय कॅडेट फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेत श्रेया क्षीरसागर, श्रेया खोत, कार्तिकी माळी, स्वराज नाईक, पीयूष पाटील आदींनी विविध वयोगटांत पहिला क्रमांक पटकावला.
लक्ष्मीपुरीतील शेलाजी वन्नाजी विद्यालयात झालेल्या या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुली अनुक्रमे विजेत्या अशा ः ईपी प्रकारात श्रेया क्षीरसागर, राधिका गुरव, सई विभूते-समीक्षा साळुंखे, फॉईल प्रकारात श्रेया खोत, आरोही शिंदे, शौर्य पाटील- स्वराली गावडे, सेबर प्रकारात कार्तिकी माळी, अनुष्का थोरवत, ज्योतिप्रिया घाडगे-मणिकर्णिका माने यांचा विजेत्यांमध्ये समावेश आहे.
१७ वर्षांखालील मुले ः ईपी प्रकारात स्वराज नाईक, वेदांत बाणे, अब्दुल रहमान गवंडी-उत्कर्ष आंबी यांचा समावेश आहे, तर फॉईल प्रकारात पीयूष पाटील, हर्षकुमार भारती, सक्षम कुरणे, सक्षम नाईक यांचा समावेश आहे. सेबर प्रकारात सत्यजित नाईक, प्रतीक माने, सिद्धेश थोरवत-युवराज माने यांचा विजेत्यांमध्ये समावेश आहे. विजेत्या संघातून जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. हा संघ ३० एप्रिल ते २ मे दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅडेट फेन्सिंग स्पर्धेसाठी निवडण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.