39927
गडहिंग्लज : मराठी विज्ञान परिषद व रावसाहेब कित्तूरकर विश्वस्त संस्थेतर्फे आयोजित विज्ञान मित्र कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
‘मविप’ची विज्ञानमित्र
कार्यशाळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ : येथील मराठी विज्ञान परिषद व रावसाहेब कित्तूरकर विश्वस्त संस्थेतर्फे विज्ञान मित्र कार्यशाळा उत्साहात झाली. गडहिंग्लज सायन्स सेंटरच्या सभागृहात चार दिवस ही कार्यशाळा चालली. संजीव सोलापुरे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. जे. बी. बारदेस्कर अध्यक्षस्थानी होते.
कार्यशाळेत जे. टी. रावण यांचे सुंदर वळणदार हस्ताक्षर, डॉ. कौस्तुभ कासार यांनी किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या समस्या व त्यावर उपाय, सोनाली पाटोळे व संजय घाटगे यांचे विज्ञानातील सोपे प्रयोग, बसाप्पा आरबोळे यांनी हॅम रेडिओ व वायरलेस यंत्रणा, डॉ. सीमा साखरे यांनी अन्नपदार्थातील भेसळ, भाग्यश्री शिंत्रे व अनिता परीट यांनी शोभेच्या वस्तू बनविणे, प्रा. अनिल मगर यांनी पक्षी निरीक्षण व निसर्ग भ्रमण, शंकर सावंत यांनी बुद्धिबळ खेळाचे महत्त्व, सलीम नदाफ यांनी विज्ञान खेळणी, डॉ. वरुण धूप व एन. बी. सावंत यांनी सूक्ष्मजीवांची दुनिया या विषयांवर मार्गदर्शन केले.
एस. डी. पद्मनावर, राजेंद्र दोशी, संतोष कित्तूरकर, डॉ. एस. के. नेर्ले, विश्वनाथ धूप, अरुण हावळ यांच्या मार्गदर्शनाखाली उदय इंदुलकर, एन. बी. सावंत, मंजिरी देशपांडे, जितेंद्र पाटील, अजित देसाई यांनी कार्यशाळा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.