कोल्हापूर

नगरपरिषद शाळा होणार डिजिटल

CD

नगरपरिषद शाळा होणार डिजिटल

गडहिंग्लज शहर ः शाळांमध्ये बसविणार इंटरॅक्टिव्ह पॅनेल

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ ः खासगी शाळांच्या स्पर्धेत उतरण्यासाठी गडहिंग्लज नगरपरिषदेकडून आपल्या शाळांचा विकास टप्प्याटप्प्याने करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर्षीचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पालिकेच्या पाचही शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी ६५ इंची इंटरॅक्टिव्ह पॅनेल खरेदीला मंजुरी दिली आहे.
गेल्या काही वर्षांपासून पालिका शाळांमधील पटसंख्या घटत चालली आहे. शहरातील खासगी शाळांमधील सुविधांच्या तुलनेत पालिकेच्या शाळा मागे पडत असल्याचा परिणाम पटसंख्येवर होत आहे. गेली चार वर्षे पालिकेवर प्रशासक होते. दरम्यान, गतवर्षी झालेल्या निवडणुकीनंतर सभागृह अस्तित्वात आले. त्यानंतर पालिका शाळांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून पालिका शाळांमध्ये डिजिटल स्वरूपात अध्यापन करण्याचा प्रयत्न पालिकेने सुरू केला आहे. पालिकेच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणासाठी सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या पाच शाळांमध्ये ६५ इंची इंटरॅक्टिव्ह पॅनेल बसविण्यास सभागृहाने मंजुरी दिली आहे. या पॅनेलसाठी सहा लाखांची तरतूद नगरपालिका निधीतून करण्यात येणार आहे. पटसंख्या वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
...................
चौकट...
दृष्टिक्षेपात डिजिटल शाळा
- इंटरॅक्टिव्ह पॅनेलमध्ये पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम
- एचडी पॅनेलमुळे उत्कृष्ट दृश्यमानता
- प्रत्येक धडा असेल इनबिल्ट
- कार्टून, सिम्बॉलयुक्त अध्यापनामुळे मुलांची ग्रहणक्षमता वाढेल
- अध्ययन-अध्यापन प्रक्रिया होणार सुलभ
...............
चौकट...
महिन्याभरात डिजिटल तारांगण
मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी पालिकेने सीएसआर निधीतून १५ लाखांची डिजिटल तारांगण यंत्रणा उपलब्ध केली आहे. ही यंत्रणा महिन्याभरातच कार्यान्वित होणार आहे. या तारांगणामध्ये विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र अनुभवता येईल. कोणकोणत्या ग्रहांवर कसे संशोधन सुरू आहे, अवकाशातील संशोधन ऑडिओ व व्हीडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. गडहिंग्लज उपविभागात पहिल्यांदाच ही सुविधा उपलब्ध होणार असून, प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. १५ बाय २० फुटाच्या खोलीत हे डिजीटल तारांगण अनुभवता येणार आहे.
...................
कोट...
पालिका शाळांच्या भौतिक विकासाबरोबरच शैक्षणिक प्रगतीही साधण्याच्या हेतूने पालिका विशेष प्रयत्न करीत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून डिजिटल शिक्षण, तारांगणाचा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. हरित गडहिंग्लजअंतर्गत प्रत्येक शाळेच्या आवारात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. विविध उपाययोजनांतून शाळांना गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
- महेश तुरबतमठ, नगराध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT