कोल्हापूर

अनुसूचित जाती उपवर्गीकरणावर कार्यशाळेचे २५ मे रोजी आयोजन

CD

अनुसूचित जाती उपवर्गीकरणावर चर्चेसाठी
२५ मे रोजी राज्यव्यापी महापरिषद : प्रा. कांबळे
कोल्हापूर : महार, नवबौध्द आणि मातंग समाजातील उपवर्गीकरणाचा वाद संपवण्यासाठी भावनिक मुद्यांपेक्षा कायदेशीर आणि तांत्रिक बाबींवर चर्चा व्हावी. समर्थक आणि विरोधकांचे म्हणणे ऐकून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, म्हणून २५ मे रोजी कोल्हापुरात अनुसूचित जाती उपवर्गीकरण संवाद महापरिषद आयोजित केली आहे, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी दिली.
शाहू स्मारक भवनात आंबेडकरी समाज पक्ष, संघटना जनआंदोलन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे आढावा बैठक झाली. बी. के. कांबळे अध्यक्षस्थानी होते. प्रा. कांबळे म्हणाले, ‘‘अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणावर होणारी चर्चा तणाव वाढविणारी आहे. ५९ जातींपैकी उर्वरित सर्वच जातींचे म्हणणे ऐकून घेत दोन्ही समाजांनी सलोखा राखावा.’’ कार्याध्यक्ष रूपाताई वायदंडे यांनी जयंतीचा आढावा घेतला. मातंग समाजाचे बाजीराव नाईक, बौध्द प्रणाली चॅरिटेबल ट्रस्टचे सुशील कोल्हटकर, सुरेश वाडेकर, किरण नामे, वंचित बहुजन आघाडीचे मच्छिंद्र कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला डॉ. के. टी. सडोलीकर, प्रताप बाबर, मलिक चिकदुळ, प्रवीण आजरेकर, बटु भामटेकर, गौतम शिंदे, शांतीरत्न सिध्दोधन, सुरेश सावर्डेकर, सुरेश वाडेकर, मधुअण्णा कांबळे, महिपती खिलारे, गौतम कांबळे, दशरथ मयेकर, दादा माने उपस्थित होते. दशरथ महेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

यवतमाळ जिल्हा बँक बरखास्तीनंतर राजकारण तापले! ‘सत्तेतच डाव-प्रतिडाव’; निवडणुकीआधीच आरोपांची सरबती

PBKS vs RR Live: प्रीति झिंटाच्या काळजाचा ठोका चुकलाच होता, पण...! श्रेयस अय्यरसोबत असं काही घडलं की, ती घाबरली; नेमकं काय?

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

आई मुस्लिम, वडील गुजराती... एकमेकांवर प्रेम असूनही आरती सोलंकीचे आई-वडील झालेले वेगळे, हे होतं कारण

SCROLL FOR NEXT