कोल्हापूर

गड-अभिनव अकॅडमी

CD

40162
नवी दिल्ली : सिक्स सिग्मा हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्ड सोहळ्यात डॉ. अमोल पाटील यांना ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कॅप्टन योगेंद्रसिंग यादव उपस्थित होते.
-----------------------------
अभिनव ग्रुपच्या
शिरपेचात दुहेरी मुकुट

राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान : अमोल पाटील यांचाही गौरव

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : येथील अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या शिरपेचात दुहेरी मुकुट घातला. अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनला ‘इमर्जिंग स्कूल ऑफ द इअर’, तर अभिनवचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अमोल पाटील यांना ‘व्हिजिनरी स्कूल ओनर ऑफ द इअर’ पुरस्काराने सन्मानित केले. नवी दिल्ली येथील सिक्स सिग्मा हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्ड सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
भारतीय नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, कारगिल युद्धातील परमवीरचक्र विजेते कॅप्टन योगेंद्रसिंग यादव, बाहुबली चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका निभावणारे अभिनेते राणा डगुपती यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम झाला. देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली होती.
अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन संस्था अल्पावधीतच नावारुपाला आली आहे. गुणवत्ता, नवकल्पना आणि विद्यार्थीकेंद्री शिक्षण पद्धती यांचा उत्कृष्ट संगम साधला आहे. स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अनुभवी व समर्पित शिक्षकवृंद, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर दिलेला भर या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामस्वरूप संस्थेला हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याचे डॉ. अमोल पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT