‘विफा’ आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा आजपासून
कोल्हापूरवः वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे व के.एस.ए. च्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य विफा आंतर जिल्हा खुला गट टीयर-१ अंतिम फेरीतील सामन्यांना आजपासून कोल्हापुरात सुरुवात होणार आहे. या स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम व पोलो मैदानावर होणार आहेत, अशी माहिती ‘केएसए’चे मानद सरचिटणीस माणिक मंडलिक यांनी दिली. स्पर्धेत कोल्हापूरसह वर्धा, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, मुंबई, नागपूर,या संघांमध्ये दोन गटांत सामने होतील. स्पर्धेची उपांत्य फेरी शुक्रवारी (ता. ८), तर शनिवारी (ता. ९) तिसऱ्या क्रमांकासाठी लढत, तर सायंकाळी अंतिम सामना रंगणार आहे. सर्व सामने सकाळी ७.३० ते दुपारी बारापर्यंत , तर दुपारच्या सत्रातील सामने २.३० ते सायंकाळी ६.३० दरम्यान होतील. ‘केएसए’चे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती यांच्या प्रयत्नातून स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत राज्यभरातील उत्कृष्ट खेळाडूंचा सहभाग असल्याने शौकिनांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘केएसए’तर्फे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.