कोल्हापूर

गड- रोजगार मेळावा

CD

gad44.jpg

41353

रोजगार मेळाव्यात
३४५ जणांना रोजगार

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. ४ ः येथील शिवराज विद्या संकुल, नांदी फौंडेशन- महिंद्रा प्राईड क्लासरूमच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या रोजगार मेळाव्यात ३४५ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली.
शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळावा झाला. मेळाव्यात ५० हून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदविला. या मेळाव्यात १२४८ बेरोजगारांनी नोंदणी केली होती. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. जडेयसिद्धेश्वर आश्रमचे महंत सिद्धेश्वर महास्वामी, श्री भगवानगिरी महाराज, सुरगीश्वर मठाचे गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींसह नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, ‘गोडसाखर’चे अध्यक्ष प्रकाश पताडे, बिद्री कारखान्याचे संचालक रंगराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. तानाजी चौगुले यांनी स्वागत केले. सचिव डॉ. कुराडे म्हणाले, ‘‘भागातील गोरगरीब, होतकरू तरुणांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध कंपन्यांमध्ये संधी मिळाली. विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी व त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहू.’’ प्रा. कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, महंत सिद्धेश्वर महास्वामी, भगवानगिरी महाराज, तुरबतमठ, अनुप जाना, बसवराज आजरी यांची भाषणे झाली. काळभैरी देवस्थानच्या अन्नछत्र विभागाला ५१ स्टील ताट प्रदान केले. शिवराजचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, संचालिका बिनादेवी कुराडे, डॉ. राहुल जाधव, ए. बी. पाटील उपस्थित होते. प्रा. विश्वजीत कुराडे, प्रा. नितीन चव्हाण, संदीप कुराडे, प्रा. विक्रम शिंदे, डॉ. महेश चौगुले आदींनी नियोजन केले. डॉ. श्रद्धा पाटील, प्रा.गौरव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. नितीन चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs LSG Live: निकोलस पूरनसह लखनौच्या फलंदाजांकडून मुंबईची धुलाई! उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य; जसप्रीत बुमराह पुन्हा फेल...

लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर

MI vs LSG Live: ६,६,६,६,६,६,६,६! निकोलस पूरनचा रुद्रावतार; १६ चेंडूंत अर्धशतक अन् नाही राहिला वैभव सूर्यवंशीचा 'तो' भारी विक्रम

Junnar Alumni Meet: जुन्नरमध्ये 1994 च्या माजी विद्यार्थ्यांची भेट; शालेय आठवणींना उजाळा

​Palghar News : जिल्ह्यातील ५७ शाळांमधील ७ हजार विद्यार्थी शिक्षणाला मुकणार; श्रमजीवी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT