कोल्हापूर

आजरा ः भादवण कार्यक्रम बातमी

CD

भादवणच्या सर्वांगीण
विकासासाठी कटिबद्ध

समरजितसिंह घाटगे ः ई-लर्निंग संचाचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
भादवण, ता. ८ ः ‘भादवण गावाने माझ्या राजकीय जीवनात वेळोवेळी साथ दिली आहे. या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू,’ अशी ग्वाही शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
भादवण (ता. आजरा) येथे नवचेतना समूहाच्या वतीने आयोजित राजे फाउंडेशनच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या ई-लर्निंग संचाचे लोकार्पण, अभ्यासिका उद्‍घाटन आणि गुणवंतांना पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते.
घाटगे म्हणाले, ‘येणारा काळ तंत्रज्ञानाचा असून, ग्रामीण भागातही ई-लर्निंग आणि अभ्यासिका अत्यंत गरजेच्या आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून पुढे येऊन स्वतःचे उत्पादन बाजारपेठेत आणावे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. महिलांनी आरोग्य तपासणीबाबत संकोच न बाळगता वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, राजे फाउंडेशनच्या माध्यमातून गावोगावी आरोग्य शिबिरे आयोजित केली जात असून त्याचा लाभ घ्यावा.’
आदर्श शिक्षक सुभाष सुतार, उत्कृष्ट शेतकरी सुनील जोशीलकर, उत्कृष्ट व्यावसायिक दयानंद पोवार, मूकबधिर महिला कासूबाई पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस भरती व इतर क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंतांचाही सत्कार झाला. आजऱ्याचे नगराध्यक्ष आशोक चराटी, सरपंच माधुरी गाडे, पंचायत राजचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत सुतार, संभाजी सरदेसाई, जनार्दन निऊंगरे, आनंदराव कुलकर्णी, समीर पारदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजेश जोशीलकर, सुनील कुराडे ,विकास बागडी, संजय केसरकर, संदीप गुरव, अनिल पाटील, मारुती देसाई आदी उपस्थित होते. रणजित गाडे यांनी स्वागत केले. सतीश खुळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

प्रवीण तरडेंचा ‘थिएटर व्हिजिट’ पॅटर्न आता बॉलिवूडमध्ये हिट! बॉलिवूडने स्वीकारला ‘तरडे फॉर्म्युला’

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT