कोल्हापूर

वीज बिल थकबाकी शून्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

CD

41725

वीज बिल थकबाकी शून्य
करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

महावितरण अध्यक्षांकडून प्रमाणपत्र वितरण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ६ : महावितरणची सर्व वर्गवारीतील वीज बिल थकबाकी शून्य करणाऱ्या कोल्हापूर परिमंडलातील ११ उपविभागीय अधिकाऱ्यांचा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी छत्रपती ताराराणी सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी महावितरणचे संचालक (संचलन) सचिन तालेवार , पुणे प्रादेशिक संचालक सुनील काकडे, कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश कोहाट, अधीक्षक अभियंते गणपत लटपटे, अमित बोकील, पूनम रोकडे आदी प्रमुख उपस्थित होते.
राज्यात संपूर्ण थकबाकी शून्य करणारे एकूण ११ उपविभाग असून हे सर्व अकरा उपविभाग कोल्हापूर परिमंडलातील आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ तर सांगली जिल्ह्यातील दोन उपविभागांचा समावेश आहे. यामध्ये नागेश बसरीकट्टी (नेसरी), दयानंद अष्टेकर(आजरा), शीतल वनारसे (शिरोळ), शरद परीट (गगनबावडा), गिरीश भोसले (कदमवाडी), दयानंद कमदगी (कळे), सारिका शेळके (कोडोली), रणजीत पाटील (पन्हाळा), समीर अत्तार (परिते), संजय बालटे (सावळज), अंबादास कटकधोंड (खानापूर) यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांना व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

चौकट
कोल्हापूर आघाडीवर
‘कोल्हापूर परिमंडलाचे ग्राहक हे सेवा, देखभाल दुरुस्ती, थकबाकी वसुली, स्मार्ट मीटर अशा सर्वच निकषांत आघाडीवर राहिले आहे. येथून पुढेही असेच चांगले काम करावे. कोल्हापूरचा ग्राहक प्रामाणिक असून त्यांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सेवा द्या. पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करा. सुरक्षा साधने वापरून काम करा. अपघात शून्य होण्यासाठी प्रयत्न करा. ग्राहकांना निर्धारित वेळेत सर्व सेवा द्या, अशा सूचना लोकेश चंद्र यांनी महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वरुणराजा तर विदर्भात सूर्य कोपणार; पुढचे २ दिवस धोक्याचे

SRH vs PBKS Live: चुकीला माफी नाही! सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दादागिरी; पंजाब किंग्सला महागात पडला ढिसाळपणा

Sunetra Pawar: मोठा राजकीय निर्णय! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा; महाराष्ट्रात फुलफोकस एंट्री

विजयला रोखण्यासाठी कट्टर शत्रू एकत्र येणार? तामिळनाडुत राजकीय भूकंपाची शक्यता, DMK अन् AIDMKच्या आघाडीची चर्चा

SRH vs PBKS Live: ३ झेल अन् १ स्टम्पिंगची संधी गमावली... पंजाबच्या खेळाडूंनी युझवेंद्र चहलवर रडण्याची वेळ आणली Video Viral

SCROLL FOR NEXT