कोल्हापूर

जिल्हा बार असोसिएशन कार्यकारिणीची सकाळ कार्यालयाला भेट

CD

41739

जिल्हा बार असोसिएशन पदाधिकाऱ्यांची ‘सकाळ’ला भेट
खंडपीठ आंदोलनातील दै. ‘सकाळ’च्या पाठबळाबद्दल आभार

कोल्हापूर, ता. ६ ः सर्किट बेंच मागणीसाठी चाळीस वर्षापासूनचा संघर्ष फळाला आला. लवकरच पूर्ण खंडपीठही होण्याची आशा आहे. या लढ्यामध्ये दै. ‘सकाळ’ने वेळोवेळी पाठबळ दिले. यापुढेही वकिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ‘सकाळ’ने पाठिंबा द्यावा; अशा अपेक्षा जिल्हा बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीने व्यक्त केल्या.
जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीनंतर नूतन कार्यकारिणीने आज ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली. अध्यक्ष ॲड. राजेंद्र मंडलिक, उपाध्यक्ष ॲड. संजय घाटगे, सचिव ॲड. विरेंद्रसिंह निंबाळकर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. ‘सकाळ’चे संपादक निखील पंडितराव यांनी स्वागत केले. ‘सकाळ’चे संस्थापक कै. ना. भी. परूळेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
नूतन अध्यक्ष ॲड. मंडलिक म्हणाले, ‘‘वकिलीचे शिक्षण पूर्ण करून दरवर्षी दोनशेहून अधिक तरुण या क्षेत्रात उतरत आहेत. मोठ्या संख्येने येणाऱ्या वकिलांना तितक्या प्रमाणात काम मिळवून देण्यासाठी जिल्हा बार असोसिएशनला प्रयत्न करावे लागतील. सर्किट बेंचमध्ये काम करण्यासाठी नव्या वकिलांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यशाळांचेही आयोजन केले जाईल. खंडपीठाचा टप्पा गाठण्यासाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांसोबत चर्चा करून पुढील दिशा ठरविणार आहोत.’’ महिला वकिलांना न्यायसंकुलामध्ये बैठक व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देऊ; असे मंडलिक यांनी सांगितले. यावेळी महिला प्रतिनिधी शुभांगी निंबाळकर, सहसचिव अवधूत पाटील, लोकल ऑडीटर सर्वेश भांदिगरे, कार्यकारिणी सदस्या पूनम पाटील- हुनूरे, राजवर्धन जाधव, संदीप वाईंगडे, श्रृतिका पाटील, श्रावणी पारसनीस, चैत्राली गुरव, सिद्धार्थ हुकेरी, वैभव गोरडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT