‘त्या नराधमांना कठोर शिक्षा द्यावी’
आजरा ः नसरापूरचा नराधम व पुलाची शिरोलीतील तरुणीचे लैंगीक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी; अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती यशोदा युवराज पोवार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठविले असून याची प्रत तहसीलदार समीर माने यांना देण्यात आली. निवेदनात म्हंटले आहे, नसरापुर व शिरोलीतील घटना निंदनीय असून धार्मिक तिढा तयार करणारी आहे. अशा घटना राज्यात घडत आहेत. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला या घटना शोभणाऱ्या नाहीत. या दोनही आरोपीवर खटला न्यायालयात चालवून त्यांना कठोर शिक्षा द्यावी. पुन्हा या राज्यात अशा घटना घडू नयेत याची काळजी घ्यावी. निवेदनावर उपसभापती यशोदा पोवार यांची सही आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.