कोल्हापूर

घरफाळा विभाग तपासणी‘

CD

41923
कोल्हापूर ः महापालिकेच्या घरफाळा विभागाने कर आकारणी नसलेल्या मिळकतींचे मोजमापही घेण्यास सुरुवात केली आहे.
--
घरफाळाच नसलेल्या २०४ मिळकती
सहा दिवसांत शोध; एकूण २९९ मिळकतींसाठी प्रक्रिया

कोल्हापूर, ता. ७ : घरफाळा विभागाने शहरात घरफाळा नसलेल्या, नियमबाह्य बदल केलेल्या मिळकतींच्या शोधासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेच्या सहा दिवसांत तब्बल २९९ मिळकतींचा शोध लावला आहे. त्यातील २०४ मिळकतधारकांनी घरफाळाच लावलेला नव्हता. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार ३० मेपर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे.
चारही विभागीय कार्यालयांमार्फत लिपिकनिहाय भाग निश्चित करून शोधमोहीम सुरू केली आहे. संबंधित मिळकतींची मोजमापे पूर्ण केली आहेत. या मिळकतींची अंतिम करआकारणी प्रक्रिया सुरू केली आहे. मिळकतधारकांकडून बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, भाडे करार पत्र तसेच क्षेत्रवाढीसंदर्भातील नगररचना विभागाची परवानगी मागवली आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. मुदतीत कागदपत्रे न दिल्यास संबंधित मिळकत या अनधिकृत समजून शास्तीसह करआकारणी करण्यात येणार, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ज्यांची अद्याप करआकारणी झालेली नाही, अशा मिळकतधारकांनी विभागीय कार्यालयातील घरफाळा विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले आहे..
.....
सहा दिवसांतील मिळकतींचा शोध-
-करआकारणीच नसलेल्या-- २०४
-मालकाऐवजी भाडेकरूंचा वापर-- ६६
-क्षेत्र वाढवलेल्या मिळकती-- २९
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case : मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने जखमा; शवविच्छेदन अहवालात आणखी काय? आरोपीला कुणी केली मदत?

Baramati Politics: अजितदादांच्या अपघाती जाण्याने जनतेचे स्वप्न अधुरे; २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनींनीच बारामतीतून लढावे : जय पवार

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

iPhone 17 चक्क 45 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय; 'इथे' खरेदी केल्यास मिळेल बंपर डिस्काउंट, ऑफर सुरू होताच लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT