42016
‘एसआयआर’ला ९० दिवसांची
मुदतवाढ द्या ः मनसेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः जिल्ह्यात आणि शहरात सध्या एस.आय.आर अभियान सुरू आहे. शहरालगत असणाऱ्या उपनगरांमध्ये एसआयआर सर्वेक्षण करण्यासाठी अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे एसआयआर मॅपिंगसाठी ९० दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. आज त्यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना दिले. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
निवेदनातील माहितीनुसार, ‘एसआयआरअंतर्गत नेमलेल्या बीएलओ यांना प्रत्येकी १२०० मतदारांचे सर्वेक्षण करायचे आहे. त्यातील बहुतांशी जणांचे ४५ टक्के काम झाले आहे. उर्वरित काम त्यांनी १० मे पर्यंत पूर्ण करायचे आहे. शहरातील उपनगरांत तीन दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करणे शक्य नाही. उपनगरात व्यक्ती एकावेळी भेटत नाहीत. बरेचजण स्थलांतरित असतात. काही ठिकाणी एकाच घरात दोन बीएलओ जातात. यामध्ये सुसूत्रता आणून हे काम पूर्ण कऱण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी वाढवून द्यावा; तरच उपनगरातील सर्वेक्षण पूर्ण होईल. अन्यथा अनेक मतदारांची नावे यादीत येणार नाही.’ निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात शहराध्यक्ष प्रसाद पाटील, विजय करजगार, अभिजीत पाटील, नीलेश आजगावकर, अरविंद कांबळे, उत्तम वंदुरे, सुनील तुपे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.