कोल्हापूर

सिंधुदुर्गातील १४ गावांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार

CD

सिंधुदुर्गातील १४ गावांतून
शक्तिपीठ महामार्ग जाणार
सुधारित अधिसूचना; सर्व्हे क्रमांकही जाहीर

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ : बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाची सुधारित अधिसूचना जारी झाली असून यात सिंधुदुर्गातील १४ गावांचा समावेश आहे. महामार्ग चौकुळ-केगद येथून जिल्ह्यात प्रवेश करेल. सह्याद्रीच्या रांगामध्ये असलेल्या गावातून बांद्याला जोडला जाणार आहे. तेथे (पत्रादेवीजवळ) तो गोव्याला जोडला जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने शक्तिपीठ महामार्गाबाबतची अधिसूचना पाच मेच्या तारखेने जारी केली आहे. महामार्गाबाबत याआधी २८ फेब्रुवारी २०२४ ला अधिसूचना जारी झाली होती. राज्यात याला ठिकठिकाणी विरोध झाला. यानंतर शासनाने मार्गात बदल करत सुधारित अधिसूचना आता जारी केली आहे. यात कोणत्या सर्व्हे नंबरमधील किती क्षेत्र या महामार्गासाठी असेल याचेही तपशील आहेत. नव्या अधिसूचनेनुसार महामार्ग चौकुळ-केगदमार्गे खाली यात १४ गावांचा समावेश आहे.
चौकट
समाविष्ट गावे
दोडामार्ग तालुका - फुकेरी, झोळंबे, कुंभवडे. सावंतवाडी तालुका - केगद, उडेली, नेने, फणसवडे, घारपी, दाभिळ, असनिये, पडवे माजगाव, पडवे, डेगवे आणि बांदा.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट ! सियाला केतनसोबत लोहगडावर जायचे नव्हते, पण... आईचा मोठा दावा

Music Benefits: गाण्यामुळे मनाला का मिळते एवढी शांतता ? जाणून घ्या,'म्युझिक थेरपी'मागचं विज्ञान...

Wilson Point Mahabaleshwar : पर्यटकांच्या 'या' कृत्यामुळे महाबळेश्वरचा विल्सन पॉइंट आता सूर्यास्तानंतर राहणार पूर्णपणे बंद; पाळीव प्राण्यांनाही नो-एन्ट्री!

Hinjewadi Metro: प्रवाशांना मोठा दिलासा! हिंजवडी मेट्रो प्रवाशांसाठी चौदा मार्गांवर बससेवा; दोन कंपन्यांशी करार, पहिल्या टप्प्यात २० बस

Accident News: एका क्षणात संपलं सगळं! संभाजीनगरातील चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, चार व्यावसायिकांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT