कोल्हापूर

दहावीत कोल्हापूर विभागाचा निकाल घसरला

CD

फोटो

दहावीत कोल्हापूर विभागाचा निकाल घसरला
विभागात कोल्हापूर अव्वल तर राज्यात द्वितीय

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी असलेल्या इयत्ता दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. त्यात कोल्हापूर विभागाने ९५.४७ टक्क्यांसह राज्यात दहाव्यांदा दुसरा क्रमांक कायम राखला. यंदा परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही, कॉपीमुक्त अभियान अधिक प्रभावीपणे राबविल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत १.४० टक्क्यांनी निकाल घटला.
दरम्यान, उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी फटाक्यांची आतषबाजी, साखर-पेढे वाटून जल्लोष करत आनंद व्यक्त केला. कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावर्षी विभागातील २,४७६ माध्यमिक शाळेतील एक लाख २९ हजार ४९९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. पैकी एक लाख २९ हजार ४९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील एक लाख २३ हजार १७१ जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.४७ आहे. एकूण ६९ हजार ६०१ मुलांनी परीक्षा दिली. त्यातील ६५ हजार ३३० जण उत्तीर्ण (९५.७४ टक्के) झाले. ५९ हजार ४०५ मुलींपैकी ५७ हजार ८४१ जणी (९८.१९ टक्के) उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ३.५० टक्के अधिक आहे.
क्रीडा प्रस्ताव दिलेले चार हजार ३०९, चित्रकलेसाठी ३० हजार १६, कलेसाठी ४३२, लोककलेसाठी २७ हजार १७९, स्काउट गाईडसाठी २० विद्यार्थी वाढीव गुणासाठी पात्र ठरले..

चौकट
१५ मुलांना पैकीच्या पैकी गुण
विभागातील एकूण १५ विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण मिळाले तर ९२८ शाळांचा निकाल शंभर टक्के आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ४१५, साताऱ्यातील ३११, सांगलीतील २०२ शाळांचा समावेश आहे.
चौकट
वस्तुस्थितीदर्शक निकाल
यावर्षीचा निकाल वस्तुस्थितीदर्शक, गुणवत्तापूर्ण आहे. याचे विश्लेषण करून पुढील पावले टाकली जाणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

परीक्षोत्तर सहा गैरप्रकार
यंदा परीक्षा केंद्रांवर एकाही गैरप्रकाराची (कॉपी) नोंद नाही. मात्र, परीक्षोत्तर चार गैरप्रकार घडले. या स्वरूपातील गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयाची संपादणूक रद्द करण्याची शिक्षा झाली आहे.
.....
जिल्हानिहाय निकाल
जिल्हा*उत्तीर्ण विद्यार्थी* टक्केवारी
कोल्हापूर *५२,३०४ *९६.६७
सातारा *३४,८५० *९५.७१
सांगली *३६,०१७ *९३.५६
......
गेल्या पाच वर्षांतील विभागाचा निकाल
२०२१*९९.९२
२०२२*९८.५०
२०२३*९६.७३
२०२४*९७.४५
२०२५*९६.८७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Price Hike Pune : वाहनधारकांच्या खिशाला कात्री! पुणे, चाकण, पिंपरी-चिंचवड, तळेगावसह हिंजवडीत CNG महागला; मध्यरात्रीपासून 'एवढ्या' रुपयांची दरवाढ लागू

DC vs KKR Live: ५१ चेंडूंवर एकही धाव नाही! दिल्ली कॅपिटल्सची लाजीरवाणी खेळी; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी आवळला फास

Latest Marathi News Update : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Suvendu Adhikari : भीती संपली, आता विश्वासाचं युग! मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच सुवेंदू अधिकारींनी फुंकलं रणशिंग; म्हणाले, 'मोदींनी सांगितल्याप्रमाणे बंगालमध्ये...'

Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

SCROLL FOR NEXT