कोल्हापूर

गड- पार कट्ट्याचे काम

CD

इस्टिमेट वाढविण्यामागच्या
हेतूची चौकशी करा ः भाजप

‘त्या’ पारकट्ट्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ ः कडगाव रोडवरील एमआर हायस्कूलसमोरील पारकट्टा बांधकामाला ४ लाख ६७ हजारांचा प्रत्यक्ष खर्च आला आहे. त्याचे बिलही काढले आहे. मग याच कामाचे इस्टिमेट १३ लाख ५२ हजार रुपयांचे करण्यामागच्या हेतूची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या चौकशीसाठी उच्चशिक्षित अभियंत्यांची समिती नियुक्ती करण्याकडेही शिष्टमंडळाने लक्ष वेधले आहे. चार लाखांत पारकट्ट्याचे सुभोभीकरण होणार होते, तर मग अंदाजपत्रक मात्र चारपटीने वाढविण्यामागचा हेतू काय, असा प्रश्न निवेदनात केला आहे. पालिकेतर्फे झालेल्या कामामध्ये अनियमितता व अवास्तव टेंडरमध्ये केलेली किंमत वाढ अनेक कामांमध्ये दिसून येत आहे. या सर्व कामांची चौकशी करण्याचीही अपेक्षा व्यक्त केली आहे. भाजपचे पदाधिकारी व नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना २३ एप्रिल रोजी सकाळी भेटून काम थांबविण्याची मागणी केली. परंतु त्याच दिवशी सायंकाळी पालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांनी काम पूर्ण झाल्याचे सांगून ठेकेदाराला ३ लाख ८५ हजारांचे बिल अदा केल्याचेही सांगितले. हा सर्व प्रकार संशयास्पद वाटतो. याशिवाय, गारगोटी-चंदगड रस्त्याचे रूंदीकरण सुरू आहे. हा पारकट्टा रूंदीकरणात जाणार असल्याकडे लक्ष वेधून हे काम करू नये, अशी सूचना २३ मार्च रोजीच निवेदनाद्वारे पालिकेला केली आहे.
या रस्त्याचे १३ मीटरने रूंदीकरण होणार असून, दोन्ही बाजूने प्रत्येकी एक मीटरची साईडपट्टी आहे. त्यामुळे एकूण १५ मीटर जागा रस्त्यासाठी व्यापणार आहे. पारकट्टा रस्त्यात गेला तर त्यावरील खर्च वाया जाणार असून, हा प्रकार जनतेच्या पैशाचा अपव्यय करणाराच ठरणार आहे. भाजपचे मंडल अध्यक्ष प्रीतम कापसे, शहराध्यक्ष संदीप कुरळे, नगरसेविका स्वाती कोरी, नगरसेवक नितीन देसाई, अनिल खोत, सुदर्शन चव्हाण, विश्वनाथ खोत यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Government : तमिळनाडूत 'थलपती'चा ऐतिहासिक 'विजय'! बहुमताचा गाठला जादूई आकडा, उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; 'द्रविडी' राजकारणात नवा अध्याय

DC vs KKR Live: लोकेश राहुलची ऐतिहासिक कामगिरी! IPL मध्ये असा पराक्रम केला, जो आतापर्यंत एकालाही नव्हता जमला...

खळबळजनक : वर्ल्ड कप विजेत्या क्रिकेटपटूच्या घरी सापडला एअरलाइन्सच्या SEO चा मृतदेह, क्रीडाविश्व हादरलं; आत्महत्या की हत्या?

Ashtavinayak Temples : गणेश भक्तांसाठी महत्त्वाची बातमी! मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील अष्टविनायक मंदिरे महिनाभर राहणार बंद

Beed Land Scam : बदलीनंतरही आरोपींसोबत 'लोकेशन' झालं ट्रेस! बीडचा भूसंपादन घोटाळा सनदी अधिकारी अविनाश पाठकांना कसा नडला? वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT