कोल्हापूर

पान २०२

CD

42242
आजरा ः शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीची शुक्रवारी बैठक झाली. त्यावेळी संपत देसाई, प्रा. सुनील शिंत्रे, तानाजी देसाई आदी.
--
शक्तिपीठच्या मोजणीला विरोध करणार
आजऱ्यात बाधित शेतकऱ्यांची बैठक; शिवारात पाय ठेवू न देण्याचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ८ ः शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित अरेखनाला (ता.५) मे रोजी अंतिम मान्यता देऊन महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जाहीर केली आहे. या आधारे काही दिवसात संयुक्त मोजणी सुरू करणार असल्याची हालचाल प्रशासनाच्या स्तरावर सुरू असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर येथील श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यालयात तालुक्यातील शक्तिपीठबाधित शेतकऱ्यांची बैठक झाली. शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक संपत देसाई अध्यक्षस्थानी होते.
श्री. देसाई म्हणाले, राज्य सरकारने अंतिम अधिसूचना (ता.५) मे रोजी जाहीर केली असून, त्याच्या आधारे शेतकऱ्यांना बेसावध ठेवून संयुक्त मोजणी करण्याचा घाट सरकारने आखला आहे. शक्तिपीठचे हे संकट शेतकऱ्यांच्या गाव शिवारात आले आहे. १५ तारखेपर्यंत संयुक्त मोजणी करून अहवाल शासनाला देण्याचे आदेश महसूल विभागाला आल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर आज तातडीची बैठक बोलावली आहे. कोणत्याही परिस्थितीत संयुक्त मोजणी पथकाला गावात किंवा शिवारात फिरू द्यायचे नाही. शक्तिपीठ महामार्ग हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी तयार राहावे.
स्वाभिमान संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले, आता ढिले पडता कामा नये. काही झाले तरी संयुक्त मोजणी करू द्यायची नाही, त्यासाठी तीव्र विरोध करूया, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील. यावेळी युवराज पोवार, युवराज जाधव, नामदेव गुरव, शांताराम पाटील, काशिनाथ मोरे, चंद्रकांत जाधव, संजय घाडगे, शंकर हाळवणकर, दिनेश कांबळे, महादेव गुरव, दिगंबर पाटील, सुभाष देसाई, संजय देसाई, प्रकाश दोरुगडे आदी उपस्थित होते.
--
तहसीलदारांना सोमवारी
देणार निवेदन
शक्तिपीठबाधित शेतकरी आजरा पंचायत समिती येथे सोमवार (ता.११) जमणार आहेत. तहसीलदार आजरा यांना शक्तिपीठच्या संयुक्त मोजणीसह या महामार्गाला तीव्र विरोध असल्याचे निवेदन दिले जाईल, असे शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीतर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suvendu Adhikari : भीती संपली, आता विश्वासाचं युग! मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच सुवेंदू अधिकारींनी फुंकलं रणशिंग; म्हणाले, 'मोदींनी सांगितल्याप्रमाणे बंगालमध्ये...'

DC vs KKR Live: ५१ चेंडूंवर एकही धाव नाही! दिल्ली कॅपिटल्सची लाजीरवाणी खेळी; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी आवळला फास

IPL 2026 : हार्दिक पांड्या रायपूरला पोहोचला, पण Mumbai Indians च्या सराव सत्रात भाग नाही घेतला! सूर्यकुमारबाबत महत्त्वाचे अपडेट्स...

Latest Marathi News Live Update : उष्माघाताला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, खडसेंची मागणी

Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

SCROLL FOR NEXT