कोल्हापूर

इचल : कापड उत्पदानात घट

CD

वस्त्रोद्योग फोटो
--
कापड उत्पादनात ४५ टक्के घट
इचलकरंजीत वस्त्रोद्योग संकटात ः अपेक्षित दर, मागणी नसल्याने अस्वस्थता
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ९ ः शहरातील वस्त्रोद्योगासमोर एकापाठोपाठ एक अशी संकटाची मालिकाच सुरू झाली आहे. त्याचा परिणाम कापड उत्पादनावर होत आहे. सध्या सरासरी ४५ टक्के कापड उत्पादन घटले आहे. यात वेळीच सुधारणा झाली नाही तर पुढील काळात वस्त्रोद्योग कोलमडून पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
अलीकडच्या काळात वस्त्रोद्योगाची घडी बसत असताना नवनवीन संकटांनी वस्त्रोद्योजक हैराण झाले आहेत. वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची अट अनेक यंत्रमागधारकांसाठी अडचणीची ठरत आहे. त्यासाठी दलालांची साखळी कार्यरत झाली आहे. तांत्रिक कारणास्तव ऑनलाईन नोंदणी झाली नाही तर वीज सवलतीला मुकण्याची भीती यंत्रमागधारकांच्या मनात आहे. दुसरीकडे सूत दरात सतत वाढ होत आहे. त्यातच वहिफणी दरवाढीमुळे यंत्रमागधारकांचे आर्थिक नियोजन बिघडत चालले आहे. कामगारांची मजुरी दरवर्षी वाढत असताना १३ वर्षे खर्चीवाले यंत्रमागधारकांची मजुरीवाढ झाली नाही. त्याचा उद्रेक पाॅवरलूम विव्हर्स असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या मेळाव्यात दिसून आला.
पंचगंगा प्रदूषणाच्या आंदोलनामुळे शहरातील प्रोसेस उद्योग पूर्णतः बंद आहे. त्यामुळे कामगार वर्गात अस्वस्थता आहे. त्याचा परिणाम हळूहळू वस्त्रोद्योगावर होत चालला आहे. कापडाला अपेक्षित भाव नाही. मागणी वाढत नाही. त्यामुळे वस्त्रोद्योगातील उलाढाल ठप्प होत चालली आहे. या सर्वाचा परिणाम म्हणजे कापड उत्पादनात घट होत आहे. सध्या वस्त्रोद्योग पूर्ण क्षमतेने सुरू नाही..
--
वस्त्रोद्योगासाठी
पुढील काळ कठीण
विविध कारणांनी कापड उत्पादन कमी करण्यात येत आहे. यात प्रोसेस बंद, सूतदर वाढ आणि खर्चीवाले यंत्रमाग कारखाने बंद यामुळे कापड उत्पादनात घट झाल्याची माहिती वस्त्रोद्योगातून दिली. त्याचे गंभीर परिणाम तत्काळ जाणवणार नसले तरी पुढील काळ मात्र वस्त्रोद्योगासाठी कठीण असू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT