कोल्हापूर

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज

CD

42427
पेरणोली ः येथे केंद्रीय शाळेच्या शताब्दी महोत्सवप्रसंगी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर. यावेळी उपस्थित प्रा. डाॅ. नंदकुमार मोरे, उदयराज पवार, वनश्री देसाई, अविनाश जोशीलकर, म्हाळसाकांत देसाई, दिनेश शेटे, बसवराज गुरव, विजय सारंग आदी. (छायाचित्र ः श्रीकांत देसाई, आजरा)
-----------------------------------------------------------------
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज

पालकमंत्री आबिटकर ः पेरणोली शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ९ ः ‘ज्या शाळेत चांगले शिक्षण मिळते, तेथे विद्यार्थी प्रवेश घेतात. पालकांकडून अशा शाळांना प्राधान्य दिले जाते. विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. ही सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी सर्वंकष पातळीवर प्रयत्नांची गरज आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. पेरणोली (ता. आजरा) येथे केंद्रीय शाळेच्या शताब्दी महोत्सवप्रसंगी ते बोलत होते. सरपंच वनश्री देसाई अध्यक्षस्थानी होत्या.
शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ नंदकुमार मोरे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, सभापती जयश्री गाडे, उपसभापती यशोदा पोवार, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, सहायक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, विजय सारंग प्रमुख उपस्थित होते. सकाळी गावातून शोभायात्रा निघाली.
संयोजन समितीचे अध्यक्ष उदयराज पवार यांनी स्वागत केले. काॅ. संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ मोरे म्हणाले, ‘सध्या प्राथमिक शिक्षणाबद्दल मूलभूत विचार करण्याची गरज आहे. मराठी शाळांविषयी तयार झालेले गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. पालकांनी सरकारला दोष न देता आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत शाळा, गाव व भूमीबद्दलचे भान कमी होत चालले आहे.’
सरपंच वनश्री देसाई, तानाजी देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. माजी शिक्षक, पंच्याहत्तर वर्षांवरील विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. राजेंद्र सावंत, उपसरपंच संकेत सावंत, अविनाश जोशीलकर, पांडुरंग लोंढे, संतोष जाधव, रावसाहेब देसाई, मुख्याध्यापक एकनाथ पाटील, रवींद्र देसाई, सुरेश कालेकर, संजय मोहिते, संयोजन समिती, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. तानाजी पावले व संजय मोहीते यांनी सूत्रसंचालन केले. उदय कोडक यांनी आभार मानले.
...............
चाैकट...
शाळा वाचविण्याची जबाबदारी पालकांची
शाळेला नवीन इमारत बांधून दिली जाईल. परंतु केवळ इमारत बांधून चालणार नाही, तर यापुढे पालकांनी शाळा वाचविण्यासाठी मुले मराठी शाळेत पाठविण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री आबिटकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

Pune Crime: पुण्यात मोठी कारवाई; ‘एमडी’ ड्रग्ज कारखाना उघडण्याचा कट उधळला, सव्वा कोटींच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक!

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

SCROLL FOR NEXT