कोल्हापूर

दहावी निकाल सं पटा

CD

दहावी परीक्षेचा निकाल
--
मणेरे हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के
कबनूर ः येथील डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या मणेरे हायस्कूलचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. गुणानुक्रमे वेदिका सुनील फासे (९७.४०), वेदा शिवानंद बनन्नावर (९७.४०), आयुष मारुती जाधव (९६.८०), अनन्या गोपीनाथ मेटे (९५.८०), श्रुती मीनल रामाजगोळ (९५.८०) विद्यालयाच्या १०६ विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता तसेच ९३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत गुण मिळवले .गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष शीतलकुमार मणेरे, सचिव अनिलकुमार मणेरे यांच्याहस्ते झाला.
-
होली मदर स्कूलचा शंभर टक्के निकाल
पेठवडगाव : येथील होली मदर इंग्लिश मीडियम स्कूल दहावी परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला. शंभर टक्के निकालाची २५ वर्षांची परंपरा कायम राहिली. २३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत . पौर्णिमा शिवाजी चौगुले हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले.
अनुक्रमे निकाल असा: श्रेया रामचंद्र पाटील (९६.८०), पौर्णिमा शिवाजी चौगुले (९६.६०), दिग्विजय राजकुमार पाटील (९५). यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष सुजयसिंह राऊत , मुख्याध्यापिका एस. व्ही. पाटील, एम. एम. गणबावले यांचे मार्गदर्शन लाभले.
-
किणी हायस्कूलचा निकाल १०० टक्के
घुणकी : किणी (ता. हातकणंगले) येथील किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे किणी हायस्कूल किणी विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७ टक्के लागला. सेमी इंग्रजीचा निकाल १०० टक्के लागला. सेमी इंग्रजीत गुणानुक्रमे विद्यार्थी असे- मनस्वी दीपक चाळके, विभावरी विठ्ठल मोहिते (९७.६०), ऋतुजा सागर कुंभार (९६.८०), अपूर्वा अरुण संकपाळ (९४.४०). मराठी माध्यम- मुफीजा आरिफ मुजावर (८३), यश संदीप कुरणे (७९.६०), तबस्सुम ताजुद्दीन महाबरी (७९.४०) यशस्वी विद्यार्थ्यांना अध्यक्ष एन. आर. पाटील, उपाध्यक्ष बाळासो पाटील, सचिव राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक बी. डी. मलगुंडे, पर्यवेक्षक डी. डी. चव्हाण आदींचे मार्गदर्शन लाभले.
----
रयत गुरुकुल स्कूलचा निकाल शंभर टक्‍के
कुंभोज ः येथील रयत शिक्षण संस्थेच्या रयत गुरुकुल पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल सलग सहाव्‍या वर्षी शंभर टक्‍के लागला. यशस्‍वी विद्यार्थी अनुक्रमे असे - तेजस्विनी सूर्यवंशी, तृप्ती कोळी (९६.२०), तनुश्री बावचे (९५.८०), तनिष्का साजणकर (९५.४०) विद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. पर्यवेक्षिका संगीता चंदोबा, मुख्याध्यापक सागर माने, शाळा स्थानिक समिती अध्यक्ष अजित पाटील, विभागीय अधिकारी अशोक शिंदे, विभागीय अध्यक्ष एम. बी. शेख, रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, चेअरमन चंद्रकांत दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.
-
आश्रमशाळेचा दहावीचा निकाल ९६ टक्के
कबनूर ः हातकणंगले येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमिक आश्रमशाळेचा दहावी परीक्षेचा निकाल ९६.५९ टक्के लागला. गुणानुक्रमे विद्यार्थी असे- श्वेता सुभाष इरकर (९१), वेदांत विशाल कांबळे (८८.४०), अलोक रायगोंडा मुधोळे (८७.६०). यशस्वी विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, सचिव राजेंद्र डांगे, सहसचिव विश्वनाथ डांगे, खजिनदार विठ्ठलराव मुसाई, हिराताई मुसाई यांचे प्रोत्साहन मुख्याध्यापक दिलीप शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.
-
जीनियस इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के
पेठवडगाव : येथील जीनियस इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागला. त्यांनी निकालाची सलग अठरा वर्षांची परंपरा कायम राखली.
यंदा ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणारे तब्बल सात विद्यार्थी असून ८१ टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणारे नऊ विद्यार्थी विशेष गुणवंत ठरले.
गुणानुक्रमे विद्यार्थी असे- हर्षल महेश कुंभार (९६.२०), ऋतुजा सुहास पवार (९६), तनुश प्रवीण उके (९४.४०), पायल विलास शंकरदास (९४), विनय महेश पोळ (९३.६०), वैष्णवी सचिन जाधव (९२). संस्थापक महेश पोळ, मुख्याध्यापिका अपर्णा पोळ आदींचे मार्गदर्शन लाभले.
-
आदर्श गुरुकुल विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
पेठवडगाव : येथील आदर्श गुरुकुल विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. गुणानुक्रमे विद्यार्थी असे- वेदांत उमेश चव्हाण (९८.४०), स्वरित खंडू मोहिते (९४.००), श्रीशैल संदीप स्वामी (९३.४०), पार्थ तेजस बुबनाळे (९३.२०), मयंक प्रशांत शेंडे (९२.८०), स्वरांजली रामचंद्र पाटील (९२.८०), सुमित माणिक जाधव (९२.६०), वेदांत भास्कर पाटील (९२.४०), श्रेयश जगन्नाथ वाघमोडे (९१.८०), सौगंधिक संदीप वंजाळे (९१.२०), आर्यन शिवाजी मोटे (९१.००), तेजस प्रदीप गुरव (९०.८०), ओंकार लक्ष्मण महारनवर (९०.८०) व सर्वेश दीपक चौगुले (९०.४०). संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. एस. घुगरे, मुख्याध्यापिका एम.डी. घुगरे, मुख्याध्यापक व्ही. एस. डोईजड, पर्यवेक्षक एस. जी. जाधव, प्रशासक एस. ए. पाटील, एस. एस. चित्ते, बी. आर. कांबळे, पी. एम. गायकवाड आदींचे मार्गदर्शन लाभले.
-
छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनचा निकाल शंभर टक्के
पेठवडगाव : येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन, ज्युनिअर कॉलेज व दिशा इंग्लिश मेडियम स्कूलचा दहावी निकाल शंभर टक्के लागला.
गुणानुक्रमे विद्यार्थी असे -सेमी विभाग - पृथ्वीराज शिंदे (८९.२०), आदित्य जगताप(८७.४०), रितेश रणदिवे(८६.८०). मराठी विभाग- समर्थ कौंदाडे (७७),
धनराज रजपूत (७६.६०),द्वितीय क्रमांक - सुशांत गायकवाड (७६.६०), करण साळुंखे (७२.६०). अनिवासी विभाग- समीक्षा गुरव (८०.२०), संचिता पाटील (७८.६०), स्नेहल कांबळे-(७६.६०), राजनंदिनी पाटील-(७६.६०). इंग्लिश मेडियम- ऋतुराज भांडवलकर (८४.४०), प्रथमेश गायकवाड (८०.६०), वेदांत खेडेकर(८०.६०), आयुष पलांडे (७८.८०). संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माने, सचिव सुवर्णा माने, खजानिस बापूसो माने, राजेंद्र पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.
--
खोतवाडी हायस्कूलचा निकाल ९९ टक्के
तारदाळ ः खोतवाडी हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८.५४ टक्के लागला. एकूण १३७ विद्यार्थी बोर्ड परीक्षेत बसले होते. १३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ४३ विद्यार्थी विशेष प्रावीण्यसह ६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत तर २५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. गुणानुक्रमे विद्यार्थी असे - शालिनी राजशेखर व्हनमाने (९६), तन्मेश सदानंद सुतार (९१ ६०), जोहा तौफिक अल्लाखान (९१.२०). संस्थापक अध्यक्ष संजयकुमार चौगुले, मुख्याध्यापक सागर चुडाप्पा, पर्यवेक्षक यासीन मुजावर आदींचे मार्गदर्शन मिळाले.

साजणी हायस्कूलचा दहावीचा निकाल ९४ टक्के
कबनूर ः साजणी (ता. हातकणंगले) येथील कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या साजणी हायस्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल ९४ टक्के लागला.
गुणानुक्रमे विद्यार्थी असे- मंथन चंद्रकांत परीट (९१.८०), दीक्षा सागर माने (८९.८०), प्राची राकेश कांबळे (८९.४०). विद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य, २० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत गुण मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार कोले यांच्या हस्ते झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इरतांना धडकी भरवणारी बातमी

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Malshiras Well Accident : हायवे पूर्ण झाल्याचा खोटा दाखला अन् 8 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू! तांदुळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, कंत्राटदार अजूनही मोकाट

FIH Hockey Nations Cup: भारतीय महिला ठरल्या चॅम्पियन! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT