कोल्हापूर

आंतरजिल्हा स्पर्धेसाठी कनिष्ठ फुटबॉल संघ शिरपूरला रवाना

CD

42791
कोल्हापूर ः शिरपूरला होणाऱ्या विफा आंतरजिल्हा कनिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेसाठी निवडलेल्या संघासोबत मधुरिमाराजे छत्रपती, माणिक मंडलिक, प्रदीप साळोखे, विश्‍वंभर मालेकर, राजेंद्र दळवी आदी.

आंतरजिल्हा स्पर्धेसाठी कनिष्ठ
फुटबॉल संघ शिरपूरला रवाना

कोल्हापूर ः शिरपूर येथे १२ ते १८ मे दरम्यान होणाऱ्या विफा महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा मुले कनिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेसाठी के.एस.ए.चा जिल्हा संघ आज रवाना झाला. निवड झालेल्या संघाचे शिबिर २ ते १० मे दरम्यान छत्रपती शाहू स्टेडीयमवर घेण्यात आले. शिबिरासाठी प्रशिक्षक योगेश सरनाईक, शरद मेढे यांनी मार्गदर्शन केले. संघात सक्षम साळोखे, ग्लेन फर्नांडिस (गोलरक्षक), पृथ्वेश गायकवाड (कर्णधार), स्वयम पाटील, श्रीरंग प्रभू, आर्यन साठे, शिवराज तावडे, राजवीर खराडे, साईराज सुतार, आदिराज जाधव, अथर्व चव्हाण, शार्दुल ढोक, हर्षवर्धन खवरे, अय्यान इरफान मस्तानवाले, वेदांत साळोखे, श्रेयस पवार, यज्ञेश पाटील, आर्यन व्हरांबळे, विराज साळवी, वीरेन पाटील यांचा समावेश आहे. संघाला के.एस.ए.चे पेट्रन इन चिफ शाहू छत्रपती महाराज, माजी खासदार संभाजीराजे, के.एस.ए.चे अध्यक्ष मालोजीराजे, मधुरिमाराजे, सरचिटणीस माणिक मंडलिक, अमर सासने, राजेंद्र दळवी यांचे प्रोत्साहन लाभले.
.........................
महिला क्रिकेट खेळाडू निवड चाचणी गुरुवारी
कोल्हापूर ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा १५ वर्षांखालील जिल्हा संघाची निवड चाचणी गुरुवारी (ता.१४) शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर सकाळी सात वाजता होणार आहे. ज्यांचा जन्म १ सप्टेंबर २०११ नंतरचा व ३१ ऑगस्ट २०१४ पूर्वीचा असेल अशा महिला खेळाडूंनी १४ मे २०२६ रोजी सकाळी आधारकार्ड, जन्म दाखल्याची झेरॉक्स, क्रिकेट किटबॅगसह उपस्थित राहावे, असे आवाहन केडीसीएतर्फे सचिन मदन शेळके यांनी केले आहे.
.........................
42787
हाँगकाँग ः येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावलेल्या गीतांजली पाटील यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
-----------------------------
आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत गीतांजली पाटील दुसऱ्या
गडहिंग्लज : योगासन स्पोर्टस् फेडरेशन हाँगकाँग यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय योगासन स्पोर्टस् चॅम्पियनशिप झाली. या स्पर्धेत येथील योग विद्या धामच्या गीतांजली पाटील यांनी दुसरा क्रमांक मिळविला. ६० वर्षांवरील वयोगटात त्यांनी हे यश मिळविले. स्पर्धेत दहा देशांतील स्पर्धकांचा सहभाग होता. हाँगकाँग येथील इंडियन क्लबमध्ये पाच गटांत ही स्पर्धा झाली. गीतांजली पाटील यांना डॉ. संजय चौगुले, शालन पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे अध्यक्ष अरविंद कित्तूरकर, संस्थापक प्रा. सदानंद वाली, बाबूराव खोत, गुरुलिंग खंदारे, शंकर खाडे, बाळासाहेब बडदारे, अरविंद सावळगी, विठ्ठल मोरे यांचे प्रोत्साहन मिळाले.
..........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

Pune Jewellery Market: पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुण्याच्या सराफा बाजारावर काय परिणाम झाला? व्यापारी काय म्हणताएत?

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

SCROLL FOR NEXT