कोल्हापूर

‘सीआयआय’ वुमेन नेटवर्कच्या राज्य अध्यक्षपदी पल्लवी कोरगावकर

CD

43444
‘सीआयआय’ वुमेन नेटवर्कच्या
राज्याध्यक्षपदी पल्लवी कोरगावकर

कोल्हापूर : भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) भारतीय महिला नेटवर्क (आयडब्ल्यूएन) महाराष्ट्र राज्य विभाग अध्यक्षपदी कोरगावकर ग्रुपच्या प्रमुख पल्लवी कोरगावकर यांची निवड झाली आहे. या पदावर निवड होणाऱ्या कोरगावकर विभागाच्या कोल्हापुरातील पहिल्या महिला आहेत. ‘सीआयआय’चे महाराष्ट्र अध्यक्ष दीपक गर्ग यांनी अध्यक्षपदी निवडीची घोषणा केली. यापूर्वी कोरगावकर यांनी दक्षिण महाराष्ट्र सीआयआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
इंडियन वुमेन नेटवर्क व्यावसायिक, करिअर करणाऱ्या महिलांसाठीचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. महिलांना त्यांच्या संबंधित कौशल्य क्षेत्रात यश मिळवण्यासाठी एकत्र आणणे, त्यांना नेतृत्व विकासासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या व्यवसायात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यास मदत, मार्गदर्शन करण्याचे काम या नेटवर्कतर्फे चालते. कोरगावकर यांच्या माध्यमातून नेटवर्कच्या महाराष्ट्र विभागाला अर्थपूर्ण योजना तयार करून राज्यातील महिला उद्योजक घडविण्यामध्ये सीआयआय योगदान देईल, अशी माहिती गर्ग यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT