कोल्हापूर

मिशन लक्षवेध अंतर्गत निवडचाचणीचे आयोजन

CD

मिशन लक्षवेधअंतर्गत
निवड चाचणीचे आयोजन

कुस्ती, वेटलिफ्टिंग, रायफल शूटिंगसाठी चाचणी

कोल्हापूर, ता. १५ : ऑलिम्पिक स्तरावर दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी राज्य शासनाच्या ''मिशन लक्षवेध'' योजनेअंतर्गत जिल्ह्यातील क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी कुस्ती, वेटलिफ्टिंग आणि रायफल शूटिंग या खेळांच्या फेरनिवड चाचण्यांचे आयोजन केले आहे. योजनेतून प्रत्येक खेळासाठी २० खेळाडूंची निवड केली जाणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी चाचणीत सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
यापूर्वी हॉकी आणि मैदानी खेळांच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, आता उर्वरित तीन खेळांसाठी २८ आणि २९ मे रोजी या फेरचाचण्या घेतल्या जाणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण, पूरक आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, राष्ट्रीय व विदेशी स्पर्धा प्रवास खर्च, प्रशिक्षक मानधन, वैद्यकीय उपचार आणि विम्याचा संपूर्ण खर्च शासनातर्फे केला जाणार आहे. यासाठी खेळाडूचे वय २१ वर्षांच्या आत असावे. खेळाडूने शालेय किंवा अधिकृत संघटनांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतलेला असावा किंवा पदक प्राप्त केलेले असावे. खेळाडू महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. गुरुवारी (ता. २८) रायफल शूटिंग छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे, शुक्रवारी (ता. २९) वेटलिफ्टिंग व कुस्ती छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे होणार असून पात्र व इच्छुक खेळाडूंनी अर्ज, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, आधारकार्ड, गत २ वर्षांतील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो या कागदपत्रांसह २६ मे पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

Monsoon : मॉन्सून २६ मे पर्यंत केरळात दाखल होण्याचे संकेत

ITI Admission : ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी २१ मे पासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू; राज्यात दीड लाखांहून अधिक जागा

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

SCROLL FOR NEXT