कोल्हापूर

गडहिंग्लज-हाजगोळी मार्गावर जादा बसची मागणी

CD

45596
गडहिंग्लज : शिवसेनेतर्फे (उबाठा) जादा बसफेरीबाबत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अवधूत पाटील, प्रकाश रावळ, संजय पाटील, वसंत नाईक आदी उपस्थित होते.

गडहिंग्लज-हाजगोळी मार्गावर जादा बसची मागणी
गडहिंग्लज : गडहिंग्लजहून हाजगोळीसाठी सकाळी नऊ आणि सायंकाळी सव्वापाच अशा दोन बसफेऱ्या आहेत. मात्र, या मार्गावरील भारमान अधिक आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गावर जादा बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेनेतर्फे (उबाठा) केली. आगारप्रमुखांना याबाबतचे निवेदन दिले. ग्रामीण भागात बसफेऱ्या कमी असल्याचे दिसून येत आहे. हाजगोळी मार्गावर सकाळी नऊला आणि सायंकाळी सव्वापाचला अशा दोन बसफेऱ्या आहेत. या मार्गावर नऊ बसथांबे आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी हे वेळापत्रक असले तरी प्रवाशांची मोठी गर्दी असते. तातडीने त्याबाबत निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा निवेदनातून दिला. तालुकाप्रमुख अजित खोत, अवधूत पाटील, विलास यमाटे, संजय पाटील, सुधाकर जगताप, मनीष हावळ, प्रकाश रावळ, दिनेश कुंभीरकर, वसंत नाईक, सुहास जाधव, तुकाराम वाघराळकर, संभाजी येडूरकर, बाळासाहेब कुंभार, विशाल चव्हाण आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

ओंकार भोजनेच्या गाजलेल्या स्कीटवर विद्या बालन फिदा; स्वतः बनवला रील, व्हिडिओ पाहून नेटकरी खुश

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Baramati News : बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश....

SCROLL FOR NEXT