कोल्हापूर

राधानगरीसह प्रमुख धरणांमध्ये १९.७७ ‘टीमसी’ पाणी

CD

राधानगरीसह प्रमुख धरणांत
१९.७७ ‘टीमसी’ पाणी
दुधगंगा वगळता इतर धरणांतून पिण्यासह शेतीसाठी वापर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : जिल्ह्यात सद्यःस्थितीला प्रमुख धरणांत १९.७७ टीएमसी पाणीसाठा आहे. यात राधानगरी १.९३, तुळशी १.४०, वारणा ११.२५, दुधगंगा २.०३, कासारी ०.६२, कडवी ०.७४, कुंभी ०.८५, पाटगाव ०.९५ टीमसी पाणी उपलब्ध आहे. यातून दुधगंगा वगळता इतर धरणांतून पिण्यासह शेतीसाठी पाणीपुरवठा सुरू आहे; परंतु अद्याप पावसाची चिन्हे नसल्याने उपलब्ध पाण्याचा अधिक काटकसरीने वापर करावा लागणार आहे.
सरकारकडून राज्यात काही दिवसांपासून नद्यांवरील पाण्यासाठी उपसाबंदी लागू केली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे; परंतु शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसाठी शुक्रवारपासून (ता. १९) तीन दिवसांसाठी शेतीसाठी उपसाबंदी शिथिल केली आहे. त्यामुळे दुधगंगा धरण वगळता इतर धरणांमधून शेतीसह पिण्यासाठीही पाण्याचा वापर सुरू आहे. सद्यःस्थितीला जलसंपदा विभागाच्या नियोजनानुसार दुधगंगा धरण वगळता इतर सर्व धरणांमधून सध्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी पाणीपुरवठा सुरू आहे.
--
पाऊस नसल्याने
तारेवरची कसरत
पाऊस अद्यापही सुरू झालेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याच्या पुरवठ्याचे नियोजन करताना येणाऱ्या काळात जलसंपदा विभागाला कसरत करावी लागणार आहे.
...................................................
प्रमुख धरणांतील साठा असा
*धरण*टीएमसी*टक्केवारी*
*राधानगरी*१.९३*२३*
*तुळशी*१.४०*४०*
*वारणा*११.२५*३३*
*दुधगंगा*२.०३*८*
*कासारी*०.६२*२२*
*कडवी*०.७४*३०*
*कुंभी*०.८५*३१*
*पाटगाव*०.९५*२६*

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात थेट २० टक्के वाढ; पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय

मोदींच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, शिंदेसेनेला मिळणार आणखी दोन मंत्रीपद? या बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवणार!

Crime: मुलगी सून म्हणून नकोच, प्रियकराच्या आईचा हट्ट, प्रेयसी संतापली अन्...; मुलाच्या आईसोबत धक्कादायक कृत्य घडलं

कोचिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल, अनेक विद्यार्थी अडकले, जीव वाचवण्यासाठी धडपड

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात पावसाची दमदार हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT