कोल्हापूर

मेस्सी बातमी

CD

४६०६०
मेस्सीचा विक्रम; अर्जेंटिनाची आगेकूच
ऑस्ट्रियावर २-० ने दिमाखदार विजय

डल्लास, ता. २२ ः येथे आज झालेल्या फिफा विश्वचषक २०२६ च्या गट ‘जे’मधील महत्त्वाच्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाने ऑस्ट्रियावर २-० अशी मात करत बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो अर्थातच विक्रमवीर लिओनेल मेस्सी. त्याने दोन्ही गोल झळकावत विश्वचषक इतिहासातील पुरुष गटातील सर्वाधिक गोलांचा विक्रम आपल्या नावावर केला.
सामन्याच्या सुरुवातीलाच मेस्सीकडे विक्रम करण्याची संधी आली होती. अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. मात्र, मेस्सीचा फटका उजव्या बाजूने बाहेर गेला. काही काळासाठी विक्रम लांबला; पण फार वेळ नाही.
पूर्वार्धात ३८ व्या मिनिटाला एका सुंदर चालीवर मेस्सीने गोल करीत आपल्या विक्रमी १७ वा गोल केला.
ऑस्ट्रियाने अर्जेंटिनाविरुद्ध अपेक्षेपेक्षा अधिक कडवी झुंज दिली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच त्यांनी अर्जेंटिनाच्या आक्रमणाला आव्हान देत मध्यफळीत चेंडूवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मेस्सीची पेनल्टी वाया गेल्यानंतर ऑस्ट्रियन खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी काही धोकादायक प्रतिआक्रमणेही रचली. मात्र, अर्जेंटिनाचा अनुभवी बचाव आणि गोलरक्षकाने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. पहिला गोल झाल्यानंतरही ऑस्ट्रियाने हार मानली नाही. त्यांनी बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले; परंतु अंतिम फटक्यांमध्ये अचूकतेचा अभाव जाणवला.
दुसऱ्या सत्रात अर्जेंटिनाने आपल्या विश्वविजेत्या संघाची परिपक्वता दाखवली. मेस्सी, आल्माडा आणि मेडिना यांच्या समन्वयातून संघाने चेंडूवरील पकड कायम ठेवली आणि ऑस्ट्रियाला फारशा संधी दिल्या नाहीत. सामना जसजसा अखेरच्या टप्प्यात पोहोचला तसतसे ऑस्ट्रियाने अधिक खेळाडू आक्रमणात पाठवले; पण त्यामुळे त्यांच्या बचावात जागा निर्माण झाली. याचाच फायदा घेत अर्जेंटिनाने दुखापत-वेळेत दुसरा गोल करत विजय निश्चित केला. अंतिम शिट्टी वाजताच स्टेडियममध्ये अर्जेंटिनाच्या चाहत्यांचा जल्लोष उसळला, तर मेस्सीच्या विक्रमी कामगिरीला उभे राहून दाद देण्यात आली. हा विजय अर्जेंटिनाच्या बाद फेरीच्या आशा अधिक बळकट करणारा ठरला..

मेस्सीचा ‘किलर इन्स्टिंक्ट’
ऑस्ट्रियाने दुसऱ्या सत्रात शिस्तबद्ध बचाव करत सामना जिवंत ठेवला होता; मात्र दुखापत-वेळेत (स्टॉपेज टाइम) मेस्सीने पुन्हा आपली जादू दाखवली. अर्जेंटिनाच्या आक्रमणादरम्यान ऑस्ट्रियन बचावपटूंनी पहिला प्रयत्न रोखला; पण गोलरक्षकाला चेंडू पुन्हा मेस्सीकडे आला. एक क्षण मोकळी जागा मिळताच त्याने अचूक फिनिश करत चेंडू गोलजाळ्यात पाठवला आणि अर्जेंटिनाचा विजय शिक्कामोर्तब केला. हा त्याचा सामन्यातील दुसरा आणि स्पर्धेतील पाचवा गोल ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT