कोल्हापूर

फिफा पोर्तुगाल

CD

दोन गोल करणाऱ्या रोनाल्डोचा करिष्मा दिसला
उझबेकिस्तानचा ५-० असा धुव्वा, बाद फेरीच्या दिशेने वाटचाल
हुस्टन, ता. २३ ः चाहते ज्या रोनाल्डोच्या खेळाची प्रतीक्षा करीत होते तो आज त्यांना फिफा विश्वकरंडक स्पर्धेतील क गटाच्या सामन्यात अनुभवयास मिळाला. रोनाल्डो चतुरस्त्र खेळाने पोर्तुगालने उझबेकिस्तानवर ५-० असा दणदणीत विजय मिळवित बाद फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. या सामन्यात रोनाल्डाने धडाकेबाज दोन गोल करून विजयाचे दरवाजे उघडले आणि नंतर दम टाकलेल्या उझबेकिस्तानवर उत्तरार्धात आणखी दोन गोल करीत पोर्तुगालने त्यांचा धुव्वा उडविला.
रोनाल्डाने या सामन्यात सहाव्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर ३९ व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल केला.
फिफा विश्वकरंडक २०२६ मधील गट ‘क’च्या महत्त्वपूर्ण सामन्यात पोर्तुगालने अनुभवी कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शानदार खेळाच्या जोरावर उझबेकिस्तानविरुद्ध पूर्वार्धातच ३-० अशी भक्कम आघाडी घेतली. सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतलेल्या पोर्तुगालने चेंडूवरील नियंत्रण राखत उझबेकिस्तानच्या बचावफळीला अक्षरशः हैराण केले.
सामन्याच्या सहाव्या मिनिटालाच रोनाल्डोने आपल्या चाहत्यांना जल्लोषाची संधी दिली. उजव्या फळीवरून आलेल्या अचूक क्रॉसचा अंदाज घेत त्याने बचावपटूंना मागे टाकत विजेच्या वेगाने झेप घेतली. चेंडू जमिनीवर येण्यापूर्वीच त्याने उजव्या पायाने मारलेला अचूक फटका गोलरक्षकाच्या आवाक्याबाहेर गेला आणि चेंडू जाळ्याची चुंबने घेताच स्टेडियममध्ये ‘रोनाल्डो... रोनाल्डो...’चा गजर घुमला.
पहिल्या गोलनंतर पोर्तुगालचा आत्मविश्वास आणखी उंचावला. मध्यफळीतून ब्रुनो फर्नांडिस आणि बेर्नार्डो सिल्वा यांनी सुरेख चाली रचत उझबेकिस्तानवर दबाव कायम ठेवला. त्याचे फळ म्हणून पोर्तुगालने दुसरा गोल नोंदवला आणि सामना पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला.
पूर्वार्ध संपण्यास काही मिनिटे बाकी असताना रोनाल्डोने पुन्हा एकदा आपल्या अफाट दर्जाची झलक दाखवली. फर्नांडिसच्या अप्रतिम थ्रू-पासवर तो बचावफळीची साखळी भेदत वेगाने पुढे सरसावला. समोर आलेल्या गोलरक्षकाला चकवत त्याने अत्यंत शांतपणे चेंडू जाळ्यात ढकलला. हा त्याचा सामन्यातील दुसरा गोल ठरला. त्या क्षणी उझबेकिस्तानचा बचाव पूर्णपणे हतबल दिसत होता.
पूर्वार्धाच्या अखेरीस पोर्तुगाल ३-० अशा सुरक्षित आघाडीवर होता. रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पोर्तुगालने आक्रमण, चेंडूवरील नियंत्रण आणि गोलसमोरील अचूकता या तिन्ही बाबतीत वर्चस्व गाजवत बाद फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकल्याचे चित्र दिसून आले.
उझबेकिस्तानच्या बचावफळीवर सातत्याने दबाव टाकत पोर्तुगालने आणखी दोन गोलांची भर घातली. ५८व्या मिनिटाला ब्रुनो फर्नांडिस याने मध्यफळीतून उभारलेल्या वेगवान चालीचा अचूक शेवट करत संघाचा चौथा गोल नोंदवला. त्यानंतर उझबेकिस्तानने बचावात्मक खेळावर भर दिला, मात्र पोर्तुगालच्या आक्रमणांना रोखण्यात त्यांना यश आले नाही. सामन्याच्या ८४व्या मिनिटाला गोंसालो रामोस याने गोलक्षेत्रात मिळालेल्या संधीचे सोने करत पाचवा गोल झळकावला. रोनाल्डोच्या दोन गोलांनी दिलेल्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या पोर्तुगालने उत्तरार्धातही वर्चस्व राखत ५-० अशा दणदणीत विजयाची नोंद केली.
चौकट
सलग सहा विश्वचषक स्पर्धेत गोल
या सामन्यात दोन गोल करून रोनाल्डोने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. सलग सहा विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला. पोर्तुगालसाठी विश्वचषक स्पर्धेत दहा गोलचाही विक्रम त्याच्या नावावर नोंदविला गेला आहे. यापूर्वी त्यांच्या देशाच्या युसेबियोने यांच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी १९६६ च्या स्पर्धेत नऊ गोल केले होते.
चौकट
चकवा गोल
या सामन्यात १७ व्या मिनिटाला डी बाहेरून पोर्तुगालला फ्रि किक मिळाली. ही किक घेण्यासाठी रोनाल्डो सज्ज होता. सारे स्टेडियम रोनाल्डोच्या किक साठी श्वास रोखून उभे होते. उझबेकिस्तानच्या गोलरक्षकाचेही रोनाल्डोवरच लक्ष केंिद्रत होते. मात्र, झाले वेगळेच. रोनाल्डो किकसाठी दोन पावले पुढे येतानाच त्याने नूनो मेंडसला किक घेण्यासाठी खुणावले आणि त्याने फ्रि किक घेतली आणि गोल डागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT