कोल्हापूर

क्लास, अभ्यासिका विनापरवाना

CD

शहरातील ८५ टक्के
खासगी क्लासेसना नोटिसा
आगीबाबत उपाययोजनांकडे दुर्लक्ष

कोल्हापूर, ता. २४ ः शहरातील ८५ टक्के क्लासेस तसेच अभ्यासिका विनापरवाना तसेच आगीबाबत उपाययोजना नसलेल्या महापालिकेच्या अग्निशमन दलाने केलेल्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विनापरवाना व उपाययोजना नसल्याने तत्काळ बंद करण्याच्या नोटिसा त्यांना दिल्या आहेत.
लखनौमध्ये झालेल्या क्लासला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन दलाने सतर्कता घेतली आहे. दलाने केलेल्या तपासणीत केवळ १० ते १५ टक्केच क्लास किंवा अभ्यासिकांनी महापालिकेची परवानगी घेतल्याचे दिसून आले आहे. उर्वरित सर्व विनापरवाना आहेत. आग लागल्यानंतर आवश्‍यक असलेल्या उपाययोजना केल्या नसल्याची गंभीर बाबही या तपासणीत समोर आली आहे. अनेक ठिकाणी दुसरा जिना नाही. काही ठिकाणी मुलांच्या संख्येनुसार बाहेर पडण्याचा मोठा दरवाजा नाही. त्यामुळे केवळ धूर आला, तरी त्यातून घाबरून धावाधाव झाल्यास गोंधळ होण्याची शक्यता आहे.
हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो, असेही अग्निशमन दलाचे मत आहे. त्यामुळे तत्काळ परवानगी घेऊन आवश्‍यक उपाययोजना करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT