पिछाडीवरून येत पुन्हा एकदा करिष्मा, इंग्लडचा स्वप्नभंग
अटलांटा, ता. १५ ः फिफा विश्वकरंडक दुसऱ्या उपांत्य फेरीतील संर्घषपूर्ण आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात अर्जेंटिनाने पिछाडीवरून येत इंग्लडचा २-१ असा पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली. लिनोनेल मेस्सीच्या धीरोत्तर खेळाचे पुन्हा एकदा प्रदर्शन त्याच्या चाहत्यांना पहायला मिळाले. दिर्घ काळ आघाडीवर राहून आणि डीच्या तोडांवर संरक्षणाची भिंत उभी करूनही इंग्लडला पराभवाचा झटका बसला आणि त्यांचे चाहत्यांना अक्षरशः रडू कोसळले. आता अंतिम फेरीत अर्जेंटिनासमोर स्पेनचे आव्हान असेल.
पूर्ण वेळेतील हा सामना आक्रमक आणि अनेकदा तापलेल्या वातावरणाचा होता. लाथाळ्यांच्या गर्तेत निघालेल्या या सामन्याचा वेग मात्र अतिशय अफलातून होता. पिछाडीवर असताना अर्जेटिनाने विजिगिषू वृत्तीने इंग्लडच्या गोल पोस्टवर दिलेल्या धडका श्वास रोखून धरायला लावणाऱ्या होत्या. पहिल्या ४५ मिनिटांत एकही गोल झाला नाही आणि सारे नाट्य घडले ते उत्तरार्धात.
इंग्लंडने ५७ व्या मिनिटाला आघाडी घेतली. उजव्या बाजूने आलेल्या जलद चढाईत बुकायो साकाने बॉक्समध्ये अचूक क्रॉस टाकला. अर्जेंटिनाच्या बचावपटूंचा अंदाज चुकवत हॅरी केन पुढे सरसावला आणि डाव्या पायाने जोरदार फटका मारत चेंडू जाळ्याच्या वरच्या कोपऱ्यात धाडला.
या गोलने तापलेल्या अर्जेंटिनाने आपल्या खेळाचा रंगच बदलला. त्यात ६१ व्या मिनिटाला मधल्या फळीतून सुरू झालेल्या सुंदर चालीत लिओनेल मेस्सीने संरक्षणभेदी पास टाकला. त्या चेंडूवर ज्युलियन आल्वारेझ वेगाने धावत गेला आणि गोलरक्षकाला चकवत उजव्या पायाच्या अचूक फटक्याने चेंडू जाळ्यात पाठवून सामना १-१ असा बरोबरीत आणला.
निर्णायक क्षण ७८व्या मिनिटाला आला. मेस्सीने कॉर्नरवरून आलेला चेंडू बॉक्समध्ये तरंगता ठेवला. बचावपटूंमध्ये झालेल्या गोंधळाचा फायदा घेत लौतारो मार्टिनेझने प्रभावी हेडर मारला. चेंडू गोलपोस्टला स्पर्श करत जाळ्यात विसावला आणि अर्जेंटिनाने २-१ अशी आघाडी घेतली.
उर्वरित वेळेत इंग्लंडने बरोबरीसाठी आक्रमणांची मालिका सुरू ठेवली. मात्र अर्जेंटिनाच्या बचावफळीने आणि गोलरक्षकाने संयमी खेळ करत इंग्लंडचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. अखेर अंतिम शिट्टी वाजताच अर्जेंटिनाने अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले, तर इंग्लंडला तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यावर समाधान मानावे लागले.
या तापलेल्या संघर्षात इंग्लंडच्या इलियट अँडरसन आणि अर्जेंटिनाच्या लिसांद्रो मार्टिनेझ यांना पिवळे कार्ड दाखवण्यात आले. पूर्वार्धात एकूण १९ फाउल झाल्याने सामन्याचा वेग अनेकदा खंडित झाला. दोन्ही संघांनी आक्रमणापेक्षा प्रतिस्पर्ध्याला रोखण्यावर अधिक भर दिल्याचे चित्र दिसले.
मेस्सीला प्रत्येक वेळी चेंडू मिळताच इंग्लंडच्या बचावपटूंनी त्याला लगेच घेरले, तर दुसरीकडे हॅरी केन आणि ज्युड बेलिंगहॅम यांनाही अर्जेंटिनाच्या बचावफळीने प्रभावीपणे रोखले. परिणामी, पहिल्या ४५ मिनिटांत कोणत्याही संघाला गोलरक्षकाची कठीण परीक्षा घेता आली नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.