कोल्हापूर

शिक्षक-पालक समन्वयातून विद्यार्थ्यांच्या यशाचा मार्ग

CD

56859
गडहिंग्लज : सुपर सायन्स अकॅडमीतर्फे गुणवंत विद्यार्थी गौरवप्रसंगी डॉ. राजा माळगी, एस. बी. पाटील, डॉ. जयवंत गुंजकर, डॉ. अनिल गवळी, डॉ. हेमराज यादव आदी उपस्थित होते.

शिक्षक-पालक समन्वयातून
विद्यार्थ्यांच्या यशाचा मार्ग
डॉ. राजा माळगी : सुपर सायन्सतर्फे गुणवंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : शिक्षकाचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य, समजूतदारपणा व पाठबळामुळे विद्यार्थी यशाच्या शिखरापर्यंत पोहचतो. शिक्षक-पालक यांच्यातील समन्वयामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुकर होतो, असे प्रतिपादन लेखक डॉ. राजा माळगी यांनी केले.
येथील सुपर सायन्स अकॅडमीतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व पालक मेळाव्यात ते बोलत होते. गांधीनगरातील गणेश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. अकॅडमीचे अध्यक्ष एस. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. प्रा. जयवंत गुंजकर, प्रा. डॉ. अनिल गवळी, डॉ. हेमराज यादव, सुनील शिंत्रे उपस्थित होते. डॉ. माळगी म्हणाले, ‘करिअरची दिशा ठरवताना केवळ अभ्यास नव्हे, तर क्षमता, मानसिकता, छंद व भविष्यातील संधीचा विचार करावा. पालकांनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादण्याऐवजी त्यांच्या संवाद साधत अडचणी समजून घ्याव्यात.’ मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. माधुरी पाटील यांनी स्वागत केले. अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. एम. चौगुले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hybrid Home Loan New Scheme: होम लोनच्या EMI ची चिंता मिटणार? ६५ महिन्यांसाठी व्याजदर लॉक करता येणार; 'या' बँकेची नवी हायब्रिड योजना आहे तरी काय?

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर

Iphone update: भारतात लाँच होणार Apple Pay; iphone युजर्सना मिळणार 'टॅप अँड पे' सुविधा!

Ajinkya Rahane निवृत्तीनंतर घेणार 'फ्रेश गार्ड'; भारत-श्रीलंका मालिकेतून करणार नवी सुरुवात!

Maharashtra Kashmir Partnership: महाराष्ट्र–काश्मीर फलोत्पादन भागीदारीला नवी चालना; द्राक्ष-सफरचंद तंत्रज्ञान देवाणघेवाणीतून शेतकऱ्यांच्या विकासाला गती

SCROLL FOR NEXT