कोल्हापूर

साहित्य-नाट्याचा रंगला सुरेल संगम

CD

58746
गडहिंग्लज : नगरपरिषद व कला अकादमीतर्फे झालेल्या कार्यक्रमात किरणसिंह चव्हाम यांनी खानदानपणाची गोष्ट या कथेचे अभिवाचन केले.

साहित्य-नाट्याचा रंगला सुरेल संगम
रसिक मंत्रमुग्ध; गडहिंग्लजला अभिवाचन कार्यक्रम उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ : गडहिंग्लज नगरपरिषदेच्या १३९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कथा अभिवाचन कार्यक्रमाने शहराच्या सांस्कृतिक जीवनात एक भावस्पर्शी क्षण निर्माण केला. नगरपरिषद व कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमाने शब्दांच्या पलीकडील भावविश्व, ही संकल्पना रसिकांना अनुभवता आली.
छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईमधील कला अकादमीमध्ये झालेल्या कथेच्या अभिवाचनमध्ये सुरुवातीपासूनच कलात्मक वातावरण निर्माण झाले. योग्य ठिकाणी रसिकांनी दिलेली टाळ्यांची दाद कार्यक्रमात अधिक रंगत आणली. कथा, वाचिक अभिनय, आवाजातील चढ-उतार आणि सुरेल पार्श्वसंगीत यांचा सुंदर मिलाफ प्रेक्षकांना खिळवून ठेवला. खानदानपणाची गोष्ट या कथेने अभिवाचनाला सुरुवात झाली. किरणसिंह चव्हाण यांनी सहज, पण प्रभावी शैली व भावपूर्ण सादरीकरणामुळे ही कथा जिवंत झाली. जातीच्या अभिमानात अडकलेल्या व्यक्तीची मानसिकता आणि बदलत्या काळाशी त्याचा होणारा संघर्ष त्यांनी वास्तवदर्शी पद्धतीने उभा केल्याने प्रेक्षकांना हसण्यासोबतच विचार करायलाही भाग पाडले.
‘कल्पना विलास’ ही कथा प्रमोद पुजारी व रिया बेतम यांनी सादर केली. प्रमोद पुजारी यांच्या वाचिक अभिनयात वेगळीच ताकद जाणवत होती. त्यांच्या आवाजातील भाव, लय आणि नाट्यमयतेमुळे प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहत होता. रिया बेतम यांनी साध्या, सहज सादरीकरणातून कथेला हळुवार स्पर्श दिला. दोघांच्या समन्वयातून साकारलेले हे अभिवाचन रसिकांना मंत्रमुग्ध केले. कथा वाचनाला अर्जुन पिसाळ यांच्या पार्श्वसंगीताने उंची दिली. शिवाजी पाटील यांनी नाट्य चळवळीविषयी मार्गदर्शन करत अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. बांधकाम सभापती गुंड्या पाटील यांच्याहस्ते उद्‍घाटन झाले. नाट्य चळवळ ही समाजाला दिशा देणारी शक्ती असून, अशा उपक्रमांना नगरपरिषद नेहमी पाठबळ देईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. नगरसेवक विठ्ठल भमानगोळ, अण्णासाहेब देवगोंडा, विकास कांबळे, डॉ. मंगल मोरबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. रामय्या हिरेमठ आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: महिलांची ओळख वडील, पती किंवा मुलांमुळे नाही... ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधींनी मांडली महिलांच्या स्वातंत्र्याची भूमिका

Velhe News : राजगड तालुक्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट! भोंदूबाबा, जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्यास थेट कारवाई, वेल्हे पोलिसांचा कडक इशारा

Ausa News : शाळेत घुसून शिक्षकांना निलंबनाची धमकी; अभिजीत दिपकेसह पाच जणांवर औसा पोलिसात गुन्हा दाखल

MITCHELL STARC: मिचेल स्टार्क-शोरिफुल इस्लामचा अनोखा पराक्रम; १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात दुसऱ्यांदा घडलं असं काही!

Marathi News Live Updates : मी पुण्यात भाषण द्यायला नाही, तुमचं म्हणणं ऐकायला आलो आहे- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT