कोल्हापूर

मुंबई विद्यापीठाच्या यश पाटीलची बाजी

CD

59296
गडहिंग्लज : घाळी महाविद्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित नवाज मुश्रीफ, डॉ. सतीश घाळी, उदय जोशी आदी.
.......................
मुंबई विद्यापीठाच्या यश पाटीलची बाजी

घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा : काव्यवाचनात पुण्याचा गोविंद भांड अव्वल

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : येथील डॉ. घाळी महाविद्यालयातर्फे आयोजित डॉ. घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या यश पाटील याने बाजी मारली, तर बीजेएस कॉलेजचा (पुणे) गोविंद भांड रत्नमाला घाळी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत अव्वल ठरला. उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत शहाजी लॉ कॉलेजची (कोल्हापूर) वैष्णवी पोतदार पहिली आली. स्पर्धेचे यंदाचे ३८ वे वर्ष होते.
युवा संघटक नवाज मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांनी प्रास्ताविक केले. देणगीदार उदय जोशी, डॉ. सरला आरबोळे, वैशाली कागवाडे, युसूफ मालदार, एन. के. माहेश्वरी यांचा विशेष सत्कार झाला. डॉ. सतीश घाळी, उदय जोशी, प्रा. शिवाजी भुकेले, स्पर्धक राधिका देठणकर व केतकी कुलकर्णी यांची भाषणे झाली. निकालपत्राचे वाचन प्रा. महेश पाटील, डॉ. नीलेश शेळके, प्रा. महेश कदम यांनी केले. प्रा. ओंकार खतकल्ले, डॉ. संदीप परीट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नागेश मासाळ यांनी आभार मानले.
दरम्यान, स्पर्धेत कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा, सांगली, रायगड, ठाणे, नांदेड, लातूर, पुणे, बारामती, बेळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धाराशिव, नाशिक, वर्धा, परभणी, गोवा, उत्तर कर्नाटकसह राज्यातून दीडशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. पूर्वतयारी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण शंकर जाधव, प्रा. सचिन टेकाळे, साताप्पा शेरवाडे यांनी, काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य गोविंद काजरेकर, प्रा. विनोद कांबळे, संजय कांबळे यांनी, तर उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण विद्या पाटील, मंजुषा शिंदे, डॉ. सूजय पाटील यांनी केले.
.................
चौकट...
स्पर्धानिहाय अनुक्रमे विजेते...
* पूर्वतयारी वक्तृत्व स्पर्धा ः यश पाटील (मुंबई विद्यापीठ), प्रज्ञा माळकर (नथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली), ऋतुजा पोवार (डीकेटीई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, इचलकरंजी), अमृता सागर (डी. के. शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गडहिंग्लज), सिद्धेश मिसाळ (दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज, इचलकरंजी), मधुरा आमणे (शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर).
* काव्यवाचन स्पर्धा ः गोविंद भांड (बीजेएस कॉलेज, पुणे), भाग्यलक्ष्मी क्षीरसागर (मुंबई विद्यापीठ), सलोनी सरतापे (किसन वीर महाविद्यालय, वाई), राधिका देठणकर (इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय, संभाजीनगर), ऋतुजा केसरकर (बी. के. कॉलेज, बेळगांव).
* उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा ः वैष्णवी पोतदार (शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर), यश पाटील (मुंबई विद्यापीठ), मिथुन माने (लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा).
...........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT