कोल्हापूर

शिरोळ नगरपरिषदेला आठ संगणक भेट

CD

शिरोळ नगरपरिषदेला आठ संगणक भेट
शिरोळ, ता. १ : ‘नैसर्गिक आपत्तीमध्ये व सामाजिक गरज ओळखून फेडरल बँकेने लोकोपयोगी मदत करून, आदर्शवत सामाजिक दायत्व जपले आहे,’ असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले. फेडरल बँकेच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) आठ संगणक संच व दोन कलर प्रिंटर शिरोळ नगरपरिषदेला देण्यात आले. या संगणक कक्षाचा प्रारंभ नगरसेवक नीलेश गावडे यांच्या हस्ते व नगराध्यक्षा योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला, त्यावेळी यादव बोलत होते.
ते म्हणाले, ‘नगरपालिकेच्या कामकाजात सुसूत्रता येऊन नागरिकांची संगणकीय कामे वेळेत व्हावीत, ही गरज ओळखून फेडरल बँकेकडून संगणक संच आणि कलर प्रिंटर भेट देण्यात आले आहेत. त्यामुळे शिरोळ पालिकेचे कामकाज निश्चितपणे गतिमान होईल.’
फेडरल बँकेतील गव्हर्मेंट बिझनेस कोल्हापूर विभागप्रमुख कुणाल ठाकरे म्हणाले, ‘महापुराच्या काळात फेडरल बँकेच्या ‘सीएसआर फंडा’तून राजापूरवाडी व बस्तवाड येथे ८० घरे दत्तक घेऊन त्यांचा संसार पुन्हा उभारला. दोन्ही गावांना प्रत्येकी एक घंटागाडी देण्यात आली. ‘वॉटर एटीएम’ बसविण्यात आले. यापुढेही बँकेच्या माध्यमातून सामाजिक दायित्व चांगल्या पद्धतीने जपण्याचा प्रयत्न केला जाईल.’ यावेळी नगरसेवक विजय आरगे, शरद मोरे, अनिता संकपाळ, विदुला यादव, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव आदी प्रमुख उपस्थित होते. शाखा अधिकारी महेश निकम यांनी आभार मानले.

Krishnaraj Mahadik Amit Thackeray : कृष्णराज महाडिकांनी पोलिसांचा डोळा चुकवला पण; अमित ठाकरेंवर जोरदार टीका, मुंबईत भाजप -मनसेमध्ये नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, मराठा आंदोलकांकडून शोले स्टाईल आंदोलन

Diet Tips: ट्रेकिंग करताना काजू-बदाम खाताय? हाय अल्टीट्यूडवर ड्रायफ्रूट्स खाणे धोकादायक! वाचा तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

Retirement Planning: 60 नाही, 43 व्या वर्षीच रिटायरमेंट! 85 लाखांचा फंड अन् 39 हजार भाडे, कपलचा प्लॅन नेमका काय?

का मोडला 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा संसार? म्हणाली, 'एखाद्याला निघून जायचं असतं तेव्हा...'

SCROLL FOR NEXT