

Krishnaraj Mahadik Amit Thackeray Mumbai political controversy
esakal
Krishnaraj Mahadik Amit Thackeray : मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात मंगळवारी मनसे आणि भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची परिस्थिती निर्माण झाली. पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या कथित प्रकारावरून भाजप युवा मोर्चाचे नेते कृष्णराज महाडिक यांनी मनसेविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मनसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करून राजकारण करत असल्याचा आरोप करत महाडिक यांनी मनसेच्या कृतीचा तीव्र निषेध केला.