कोल्हापूर

गड- प्रियदर्शनी पतसंस्था

CD

61726
गडहिंग्लज ः प्रियदर्शिनी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना अरुण शहा. शेजारी विश्वनाथ पाटील, नीळकंठ हिरेमठ यांच्यासह संचालक, विश्वास देवाळे उपस्थित होते.

प्रियदर्शिनी नागरी पतसंस्थेला
५५ लाखांचा नफा ः शहा

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ ः येथील प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सभा उत्साहात झाली. संस्थेला अहवाल वर्षात ५५ लाख १६ हजारांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थाध्यक्ष अरुण शहा यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना दिली.
संस्थेकडे १०० कोटींच्या ठेवी असून, ७५ कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आवश्यक तरतुदी करून संस्थेला सभासद, ठेवीदार, कर्जदारांच्या विश्वासामुळे नफ्यात लक्षणीय वाढ झाली. सभासदांना यंदा १२ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. विषयपत्रिकेचे वाचन सरव्यवस्थापक विश्वास देवाळे यांनी केले. सीमा पाटणे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. संस्थापक ॲड. विश्वनाथ पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. नेसरी, गारगोटी व कोल्हापूर येथील शाखांची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे सांगितले. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा व १०-१२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. रामगोंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष नीळकंठ हिरेमठ यांनी आभार मानले. संचालक डॉ. सदानंद पाटणे, ॲड. बाळासाहेब पाटील, डॉ. विनय माने, आदित्य गाडवी, निजलिंगाप्पा अरळी, विशाल पाटील यांच्यासह शाखा सल्लागार, सर्व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : पुणे जिल्ह्यात सहा दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकास परवानगी

CM Devendra Fadnavis : बजाज फिनसर्व्हच्या मुख्यालयामुळे पुण्‍यात ४० हजार रोजगारांची संधी

Marathi News Live Updates : ''मला कॅन्सर झाला, ईडीच्या तुरुंगात असताना आजाराची सुरुवात'', संजय राऊतांचा मोठा खुलासा

CM Devendra Fadnavis : लोकसहभागानेच ‘डीजे’ चे स्तोम कमी होईल; पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा

Pune News : राज्यसेवा मुलाखतीसाटी ‘बार्टी’कडून आर्थिक सहाय्य

SCROLL FOR NEXT