62110
गडहिंग्लज : सोळा वर्षांखालील आंतर अकादमी फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करताना महादेव पाटील. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
.....................
सोलापूर, बेळगावची विजयी सलामी
अभिजित चव्हाण फुटबॉल स्पर्धा : युनायटेडची आगेकूच; पुण्याचे आव्हान सपुंष्टात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : सोळा वर्षांखालील आंतरराज्य आंतर अकादमी फुटबॉल स्पर्धेत सोलापूर मॉडेल फुटबॉल अकादमी, बेळगाव मानस स्पोर्टस् फाउंडेशन, मिरज मंगळवार पेठ अकादमी यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. पुण्याच्या वसंतराव डावखरे स्कूलचे आव्हान संपुष्टात आले. यजमान गडहिंग्लज युनायटेड स्कूलनेही आगेकूच केली. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत अभिजित चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.
ज्येष्ठ माजी खेळाडू महादेव पाटील यांनी नारळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन केले. प्रशिक्षक मानस नायक, राष्ट्रीय खेळाडू सौरभ पाटील, प्रवीण पटके, सौरभ जाधव उपस्थित होते. समन्वयक सूरज हनिमनाळे यांनी स्वागत केले. ललित शिंदे यांनी आभार मानले. उद्घाटनाच्या सामन्यात सोलापूरच्या मॉडेल अकादमीने बेळगावच्या मानस स्पोर्टसला २-० असा धक्का दिला. सोलापूरचा सिद्धार्थ भंडारी दोन गोल करून विजयाचा शिल्पकार ठरला. याच गटातील दुसऱ्या सामन्यात मॉडेल अकादमीने युनायटेड स्कूल ‘ब’ संघाला २-० असे हरवून उपांत्य फेरी निश्चित केली.
चुरशीच्या सामन्यात मिरजेच्या मंगळवार पेठ अकादमीने पुण्याच्या वसंतराव डावखरे स्कूलला टायब्रेकरवर ५-४ असे नमविले. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत होता. मिरजेतर्फे अरहान डोर्ले, आरुष मस्ती, आयन बोंबिल, प्रज्वल पोवार, अभिषेक दाभाडे, तर पुण्याच्या श्रेयस त्रिवेदी, शिवलिंग अवधूते, ओम देवकर, आनंद बाबर यांनी गोल केले. युनायटेड फुटबॉल ‘अ’ संघाने मिरज आणि पुणे संघाचा सहज पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्यांनी मिरज आणि पुण्याचा सहा गोलनी पराभव केला. युनायटेड स्कूलच्या ओम चव्हाण, श्रीराज सरदेसाई, रिहान अत्तार, वर्धन अनंतपुरे, अभिषेक सासने यांनी गोल केले. साखळी सामन्यासाठी सक्षम तोंदले, पार्थ म्हेत्री, प्रसाद पवार, दत्ता चव्हाण, समर्थ गुंठे, वेदांत कडूकर यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.