कोल्हापूर

पर्यटन मालिका भाग - २

CD

पान १०२ वर लोगो
पर्यटन विकासाचा धोरण लकवा मालिका भाग -२
----
उपक्रम झाले उदंड, मात्र सातत्यात खंड
पर्यटन विकासाच्या योजना कागदावरच; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता

ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक योजना, उपक्रम, महोत्सव झाले. मात्र, यातील कोणतीच योजना, उपक्रम पुढे सुरू राहिला नाही. प्रशासनाने यातील कोणत्याच उपक्रमाला चालना दिली नाही. त्यामुळे पर्यटन विकास केवळ कागदावरच राहिला.
‘आरंभ शूर’ हा शब्दप्रयोग स्थानिक प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना लागू होतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘आडवाटेचे कोल्हापूर’ हा उपक्रम सुरू केला. काही काळानंतर हा उपक्रम बंद झाला. २०२२ मध्ये ‘वर्ल्ड टुरिझम विक’ ही संकल्पना राबवली गेली. यात
१२ तालुक्यांत उपक्रम राबवले गेले. शहरातही गुजरी, लक्ष्मीपुरी येथे पर्यटकांना आकर्षित करतील, असे उपक्रम झाले. या अंतर्गत धान्य महोत्सव, कापड जत्रा असे उपक्रम राबवले. मात्र, पुढे काहीच झाले नाही. राहुल रेखावार जिल्हाधिकारी असताना त्यांनी पर्यटन विषयातील तज्ज्ञ आणि व्यावसायिकांची एक समिती केली होती. या समितीने पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या होत्या. मात्र, त्या उपाययोजनाही कागदावरच राहिल्या. पागा इमारतीत पर्यटकांना माहिती केंद्र कालांतराने ते बंद झाले. पर्यटकांना देण्यासाठी ‘कोल्हापूरची शिदोरी’ बनवली. यात कोहापुरात बनणारी अनेक उत्पादने होती. मात्र, पुढे याचेही काही झाले नाही. क्रिडाई संस्थेने राज्य शासनाच्या पर्यटन विभागाबरोबर एक करार केला होता. यात ‘होम स्टे’चे एक मॉडेल बनवणे अभिप्रेत होते. मात्र, राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने काही केले नाही. स्थानिक प्रशासनानेही याचा पाठपुरावा केला नाही. तालुक्यांत ज्यांना पर्यटन व्यवसाय करायचा आहे, त्यांना प्रशिक्षण देण्याची योजनाही बनवली होती. मात्र, त्याचेही काही झाले नाही. ‘हेरिटेज टुरिझम’, ‘फुटबॉल स्ट्रीट’, ‘हेरिटेज स्ट्रीट’ या सर्व घोषणा तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही केल्या होत्या. त्या प्रत्यक्षात आल्याच नाहीत.

-----------------------------------------------------------------
दसरा महोत्सवाचे काय झाले?
पर्यटनाला चालना देण्यासाठी कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला गेला. पहिल्या वर्षी यासाठी शासनाने निधी दिला. मात्र, त्यानंतर निधी आला नाही. यानिमित्त होणाऱ्या महोत्सवाची जाहिरात अन्य जिल्ह्यांत सोडाच, पण कोल्हापुरातही फारशी होत नाही. त्यामुळे नागरिकांचा अल्प प्रतिसाद राहतो.
-----------------------------
हुपरीचा प्रस्ताव शासन दरबारीच
हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन खोत यांनी एक प्रस्ताव प्रशासनाला दिला होता. हुपरी येथे चांदीचे दागिने बनवण्याचे प्रात्यक्षिक पर्यटकांना दाखवणे आणि तेथेच ते खरेदीसाठी उपलब्ध करून देणे असा प्रस्ताव होता. थायलंड आणि इंडोनेशियामध्ये अशा प्रकारचे उपक्रम आहेत. मात्र, यावरही प्रशासनाने काहीच केले नाही.
-------------------------
हे उपक्रम सुरू आणि बंदही
-‘आडवाटेचे कोल्हापूर’
-‘वर्ल्ड टुरिझम वीक’
-धान्य महोत्सव, कापड जत्रा
-पागा इमारतीतील पर्यटक माहिती केंद्र बंद
-‘हेरिटेज टुरिझम’
-‘फुटबॉल स्ट्रीट’
- ‘हेरिटेज स्ट्रीट’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT