कोल्हापूर

गडहिंग्लजला शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

CD

64745
गडहिंग्लज : माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात तालुकास्तरीय शालेय शासकीय बुद्धिबळ स्पर्धा झाली.
...............
गडहिंग्लजला शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

तीन गटांत २२८ खेळाडूंचा सहभाग : ३० जणांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि गडहिंग्लज तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय शासकीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात झाली. १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात २२८ खेळाडू सहभागी झाले होते. यातील विजेत्या ३० खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात ही स्पर्धा झाली.
गटनिहाय अनुक्रमे विजेते असे ः १४ वर्षांखालील मुले - श्रेयस हराडे, अनुप चिनगुडे, प्रिन्स पाटील, दर्शन धुळाज, आदर्श पाटील. मुली - तनुजा गुरव, सान्वी खमलेटी, वेदिका चौगुले, ऋतुजा हेंडगे, अदिती गाडवी. १७ वर्षांखालील मुले - श्रेयस पाटील, स्वरूप साळवे, विराट शेवाळे, श्रेयस पाटील, रितेश शेरेकर. मुली - नीता धुळाज, प्रणिती देशपांडे, प्रगती भानवसे, वैष्णवी नार्वेकर, सिद्धेश्वरी तोडकर. १९ वर्षांखालील मुले - विनीत सुतार, अथर्व पाटील, गौरेश बिरंजे, वेदांत हत्तरगी, रोहित तडवी. मुली - सिद्धी पाटील, प्रणवी माने, प्रणाली नांदवडेकर, अनुपमा मगदूम, सेजल पाटील. या खेळाडूंची निवड महावीर कॉलेज (कोल्हापूर) येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय मानांकन प्त बुद्धिबळपटू शंकर सावंत यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
राजाराम माने यांनी स्वागत केले. संपत सावंत यांनी प्रास्ताविक केले. विनायक नाईक, विकास पाटील, संदेश कोकितकर, रमेश चौगुले, सुनील रेडेकर, संतोष देसाई, देवदत्त कांबळे, आदींच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा सत्कार झाला. मदन दंडगीदास यांनी सूत्रसंचालन केले. राहुल रेडेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT